शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

CoronaVirus Live Updates : अंधारात प्रकाशाची वाट... बरे होणाऱ्यांच्या संख्येत एप्रिलमध्ये अधिक वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:17 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates : एप्रिलच्या गेल्या १९ दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून या महिन्यातच २१ हजार ७७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जळगाव - रुग्णसंख्या व मृत्यूची संख्या वाढत असल्याने चिंतेत असलेल्या जळगाव जिल्ह्यासाठी अंधारात थोडी का होईना पण प्रकाशाची वाट समोर आली आहे. एप्रिलच्या गेल्या १९ दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून या महिन्यातच २१ हजार ७७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नव्या रुग्णांपेक्षा ही संख्या ३६६ ने अधिक आहे. यामुळे थोडा का होईना मात्र, या बिकट परिस्थितीत दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सरासरी १ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनातून बरे होऊन परतत आहेत. ही संख्या वाढून थेट १२०९ पर्यंतही गेली आहे. नवीन रुग्ण कमी व बरे होणारे अधिक यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे. सद्यस्थितीत आपण १५ हजार रुग्णांसाठी सज्ज असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट होत असल्याचे चित्र असताना आता बरे होणारे वाढल्याने ऑक्सिजन बेडवरील अतिरिक्त ताण काहीसा कमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दहा दिवसातील स्थिती

१० एप्रिल रुग्ण ११५५, बरे झालेले ११७६

११ एप्रिल - रुग्ण ११६७, बरे झालेले ११६०

१२ एप्रिल - रुग्ण १२०१ बरे झालेले ११७६

१३ एप्रिल - रुग्ण ११४३, बरे झालेले ११९५

१४ एप्रिल - रुग्ण ९८४, बरे झालेले १०४४

१५ एप्रिल - रुग्ण ९३४, बरे झालेले ११९५

१६ एप्रिल - रुग्ण १०३३, बरे झालेले ११७४

१७ एप्रिल - रूग्ण १११५ बरे झालेले ११०३

१८ एप्रिल - रुग्ण १०५९, बरे झालेले १०७४

१९ एप्रिल रुग्ण ११४७, बरे झालेले १२०९

चोपड्यात हजारापेक्षा कमी रुग्ण

मध्यंतरी मोठे हॉटस्पॉट म्हणून समोर आलेल्या चोपडा तालुक्यात आता सक्रिय रुग्णांची संख्या ८५६ वर आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारीही चोपडा तालुक्यात १२२ नवे रुग्ण आढळून आले तर १८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली गेल्याने काहीसा दिलासा आहे. यासह जळगाव शहरातीलही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असून या ठिकाणची सक्रिय रुग्णसंख्या ही २३६६ वर आली आहे.

बरे झालेले रुग्ण

जळगाव शहर २५०

चोपडा १८९

भुसावळ १८५

अमळनेर ९७

रावेर ६२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याJalgaonजळगाव