भास्कर पाटीलमहिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : महिंदळे परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पार कंबरडेच मोडले. शेतकऱ्यांच्या हाती आलेले ज्वारी, बाजरी, मका, कपाशी व कडधान्य पूर्ण वाया गेले. हजारो रुपये पिकांसाठी खर्च झाला. परंतु हाती दमडीही येणार नाही. आता आस फक्त शासनाच्या मदतीची. अधिकारी मात्र फिरकायला तयार नाहीत, अशी शेतकºयांची व्यथा आहे.परिसरात काही शेतकºयांनी विहिरींच्या तोडक्या पाण्यावर ठिबकच्या माध्यमातून मोठया प्रमाणात उन्हाळी कपाशीची लागवड केली होती. बºयापैकी मालही परिपक्व झाला होता. पण सततच्या पावसामुळे पूर्ण माल सडला व उरला सुरला परतीच्या पावसाच्या विळख्यात सापडला व त्याला झाडावरच कोंब फुटले. आता तर लाल्या रोगाचेही आक्रमण कपाशीवर झाले आहे. पूर्ण कपाशी लाल पडली आहे.मका, ज्वारी, बाजरी व कडधान्य हाती आले होते, पण अवकाळी पावसाने त्यांनाही शेतातच कोंब काढले. चारा तर पूर्ण सडला. गुरे हा चारा खात नाहीत. आता पुढे चारा कसा उपलब्ध करायचा हा यक्ष प्रश्न शेतकºयांना सतावत आहे. धान्यखाण्या योग्य नाही. पुढे चरितार्थ कसा चालणार या विवंचनेत शेतकरी व मजूर वर्ग आहे.मजूर वर्गाला काम नाहीगेल्या पंधरा दिवसापासून सततच्या पावसामुळे शेतीची कामे पूर्ण बंद आहेत. पावसाची उघडीप जरी असली तरी शेतात कामेच नाहीत. शेतकºयांचे हाती आलेले उत्पन्न वाया गेल्यामुळे शेताकडे कुणीही जायला तयार नाहीत. त्यामुळे मजूर वर्गाच्याही हाताला काम नाही. काम नसल्यामुळे मजूर वर्गावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
महिंदळे परिसरात पिकांच्या पंचनाम्याची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 5:17 PM