लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या महिन्यात लसीकरण केंद्रांवर उसळणारी गर्दी आता कमी झाली असून कोविशिल्ड लसीबाबच्या निकष यामुळे या लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे साठा बर्यापैकी शिल्ल्क राहत आहे. आता १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू करावे, अशी मागणी समोर येत आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात हे लसीकरण सुरू होऊ शकते, असे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
महापालिकेच्या या केंद्रावर असेल लसीकरण
बुधवारी छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, डी.बी.जैन रुग्णालय, शाहीर अमर शेख रुग्णालय, नानीबाई अग्रवाल हॉस्पीटल, मुलतानी हॉस्पीटल, मनपा शाळा क्रमांक ४८, कांताई नेत्रालय, स्वाध्याय भवन महापालिकेच्या या आठ केंद्रांवर ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहेत.