वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात साथीचे आजार पसरू नये यासाठी येथील तरूणांनी सामाजिक बांधीलकी जपत १ जुलै रोजी ग्रामस्वच्छता केली.बहुळा नदीजवळील विसावा चौक येथून साफसफाई मोहिमेस सुरुवात केली. परिसरात तसेच नदीच्या काठावर पुराच्या पाण्याने वाहून आलेला व पुलाच्या मोऱ्यांमधे अडकून पडलेला काडीकचरा काढून जाळला. यावेळी पाचोरा रोटरी क्लबचे अध्यक्ष व स्वराज ग्रुपचे संस्थापक डॉ.भूषण मगर, वरखेडी येथील डॉ.धनराज पाटील, योगेश चौधरी, विजय शिवदे उपस्थित होते.विसावा चौकात अंत्ययात्रेच्या वेळी या ठिकाणी मृत व्यक्तीस विसावा देऊन अंत्ययात्रा पुढे जाते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले होते. हा परिसर चकचकीत करण्यात आला.यानंतर या तरूणांनी वरखेडी खुर्द गावातील सर्व गल्ल्यांचीदेखील साफसफाई केली. या मोहिमेत देवीदास कुंभार, कल्पेश सोनार, मनीष भोई, रोहित जगताप, निशांत वणारसे, चिमू पाटील, बंटी भोई, शुभम पाटील, दादू पाटील, अतुल पाटील, सागर कुंभार, विशाल पाटील, कुणाल पाटील, भावेश पाटील, जतीन पाटील, जगदीश पाटील, दीपक भोई, उमेश बारी, दादू पाटील, यश पाटील, सोनू पाटील, विक्की भोई आदी तरूणांनी सहभागी होत स्वच्छता केली.
वरखेडी येथे तरुणांनी घाणीचे साम्राज्य नाहीसे करण्यासाठी केली गावसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 3:35 PM