पुरातत्व विभाग,जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी,मुख्याधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून काम करण्यास भाग पाडले होते परंतु पुन्हा या कामास हेतुपुरस्सर दिरंगाई होत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे.
अमळनेर शहराला सदैव इतिहासाची साक्ष देणारा प्रेरणादायी दगडी दरवाजा सुमारे दोन वर्षांपूर्वी ढासळला असून राजकीय खेळीमुळे की हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे ऑगस्ट २०२० पासून कार्यारंभ आदेश देऊनदेखील कामात आजपर्यंत कुठलीही प्रगती दिसत नाही. मागील काळात संबंधित ठेकेदार यांना फार मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले परंतु त्यावर काही तरी मार्ग काढणे आवश्यक असतांना देखील संबंधित विभागामार्फत दुर्लक्ष केले जात आहे. येत्या दहा दिवसात युद्धपातळीवर काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडू असे निवेदन पंकज चौधरी यांनी दिले आहे.