जळगाव : हतनुर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाणात वाढ होणार असल्याने हतनुर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.तापी नदी च्या काठावरील व धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विशेषत: रात्रीच्या वेळी नदी नाल्याच्या पाण्याची पातळी वाढण्याची दाट शक्यता असल्याने नदी पात्रात पाणी असताना आत जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नका, पाणी उकळुन प्या, सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या, मातीच्या घरांची विशेष काळजी घ्या, अन्न पाणी साठवून ठेवा. गरज भासल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष ,जिल्हाधिकारी कार्यालय साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हतनूरचे ४१ दरवाजे उघडल्याने दक्षतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 12:33 PM