जळगाव : वाघूर धरणात यंदा कमी जलसाठा असल्याने शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन मनपाकडून केले जात आहे. मात्र दुसरीकडे मनपाच्या दुर्लक्षामुळे शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईनीत झालेल्या गळत्यांमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे मनपाने तीन दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यापेक्षा जर गळत्यांमधून वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी प्रयत्न केले तर शहरात सध्या सुरु असलेल्या नियोजनानुसार पाणी पुरवठा केला तरी पावसाळ्यापर्यंत शहराला पाणी पुरवठा होवू शकतो.यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने जळगावला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका जलसाठा शिल्लक राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून शहरात या महिन्यापासून तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हे नियोजन करताना गळ्त्यांमधून वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी ज्या उपाययोजना मनपाकडून होणे अपेक्षित होते. त्या उपाययोजना मनपाकडून होताना दिसून येत नाही. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.गरजेपेक्षा जास्त पाण्याची मागणीसध्या शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दररोज शहरात ४५ मिनीटे पाणी पुरवठा केला जातो, शहराला दररोज ८० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. मात्र, अनेक ठिकाणी असलेल्या गळत्यांमुळे २० ते ३० एमएलडी पाण्याची मागणी वाढली आहे. कारण शहरात असलेल्या गळत्यांमुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हा प्रकार सुरु आहे. तसेच असे असतानाही याबाबत मनपा प्रशासनाला कुठलेही गांभिर्य दिसून येत नाही.चार महिन्यात कमी झाला १८ टक्के जलसाठासप्टेंबर अखेरपर्यंत वाघूर धरणात ४८ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यानंतर चार महिन्यात तब्बल १८ टक्के जलसाठा कमी झाला असून, सध्यस्थितीत धरणात ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. तसेच सिंचनासाठी देखील धरणातून एखादे आवर्तन सोडल्यास मे पर्यंत पुरेल इतका जलसाठा शिल्लक राहण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे मनपाने गळत्या रोखाव्यात.मनपाच्या दुर्लक्षामुळेच निर्माण होईल ‘पाणी टंचाई’नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन मनपाकडून केले जात आहे. मात्र, मनपाने नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करण्यापेक्षा आपल्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनाच जर हे आवाहन केले असते तर बरे झाले असते. कारण शहरात नागरिकांच्या दुर्लक्षामुळे नाही तर मनपाच्या दुर्लक्षामुळे पाणी वाया जात आहे. त्यामुळे भविष्यात शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्यास केवळ मनपा प्रशासनच जबाबदार राहणार आहे. त्यामुळे मनपाने आताच शहरात होणाºया पाणी गळतीविषयी उपाययोजना करण्याची गरज आहे.गळती दिसल्यास ‘लोकमत’ ला कळवाशहरात कुठल्याही भागात गळती आढळल्यास त्या बद्दलची माहिती अजय पाटील (८८८८२६११८९) यांच्या व्हॉटस्अॅपला पाठवावी, याबाबत योग्य ती प्रसिद्ध करण्यात येईल आणि महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.गळत्यांवर तकलादू दुरुस्तीवाघूर धरणातून येणाºया पाईपलाईनला असलेल्या गळत्यांबाबत ‘लोकमत’ ने १० जानेवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपाने गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, ही दुरुस्ती केवळ तकलादू ठरत आहे. रायपूूर, कंडारीला गळत्या सुरुच आहे. यासह शहरातील भागांमध्ये किरकोळ गळत्या या कायमच आहे. काही ठिकाणी अनेक महिन्यांपासून गळती सुरुच आहे. यामध्ये शिवकॉलनी उड्डाणपुलच्या खालील रस्त्यालगत, विद्या इंग्लिश स्कू ल, मेहरुण भागात कायमच गळती सुरु असते. महाबळ कॉलनीतही गळती कायम असते.
गळत्यांकडे दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 11:24 AM
मनपाचा ढिम्म कारभार
ठळक मुद्देतीन दिवसाआड पाण्याचे नियोजन करताना गळतीकडे लक्ष देण्याची गरज