अमळनेर,दि.4- अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. ते आवर्तन मुडी-बोदर्डेर्पयत आले आहे. पांझरा नदीत पाणी आल्याने या परिसरातील जवळपास 20 गावांची पाणी समस्या तूर्त सुटली आहे.
मुडी-बोदर्डे परिसरात मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. पांझरा नदीवर मुडी-बोदर्डे, कळंबू, ब्राrाणे, भिलाली, लोण,मांडळ, तांदळी,शहापूर, बेटावद आदी गावांच्या पाणी पुरवठा विहिरी आहेत. पांझरा नदी आटल्याने, त्याचा परिणाम त्या-त्या गावांच्या पाणी पुरवठय़ावर होऊ लागला होता.
पांझरा काठावरील गावांना पाणी टंचाई भासू नये म्हणून अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याची मागणी होती.अखेर अक्कलपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. ते आवर्तन मुडी-बोदर्डेर्पयत पोहचले आहे.पांझरेत पाणी आल्याने, जि.प.सदस्या संगीता भिल यांनी पांझरा नदीला साडी-चोळी अर्पण करून, जलपूजन केले. यावेळी संजय पाटील, शांतीलाल पाटील, संजय सोनवणे, नारायण पाटील, रवींद्र पाटील, मनोज पाटील उपस्थित होते. पांझरेत पाणी सोडल्याने या परिसरातील गावांची पाणी टंचाईची समस्या सुटणार आहे. पाण्याचे आवर्तन सुटण्यासाठी आमदार स्मिता वाघ यांनी प्रय} केले होते.