जळगाव, दि.4- राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गानजीक 500 मीटर अंतरातील बियर बार बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने शहरात जवळपास 100 बियरबार बंद झाले आहेत. न्यायालयाच्या आदेशांपासून बचावलेले फक्त सहा बियर बार सुरू असून, बंद बिरयबारमधील कारागीर, कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. तर बियरबारमध्ये होत असलेली ग्राहकांची गर्दी लक्षात घेता 60 मि.ली., 90 मि.ली.च्या पेगचे दरही 10 ते 15 रुपयांनी वधारले असून, यासोबत सोडा, पाणी याच्या बाटल्यांमागेही दोन ते तीन रुपये अधिक आकारले जात आहेत.
1 एप्रिलपासून शहरातील 100 पेक्षा अधिक बियरबार बंद झाले आहेत. राज्यमार्ग, महामार्ग यापासून 500 मीटरपेक्षा अधिक अंतरावर असलेले फक्त सहा बियरबार शहरात सुरू आहेत. या बियरबारमध्ये दारू व जेवणासाठी येणा:या ग्राहकांची संख्या पाच पटीने वाढली आहे.
रामनवमीनिमित्त शहरातील सर्वच बियरबार बंद होते, फक्त देशी दारूची काही दुकाने सुरू होती. या दुकानांवर मोठी गर्दी होती. भजेगल्ली परिसरातील एका दुकानात तर बाहेर्पयत रांग होती. यामुळे इतर वाहनधारकांना अडथळा होत होता.
कारागिरांची संख्या वाढविली
ग्राहकांची गर्दी एकाच वेळी होत असल्याने संबंधित बियरबार मालकांना कारागीर, कर्मचारी यांची संख्या वाढवावी लागली आहे. सकाळपासून सायंकाळर्पयत बियरबारमध्ये मोठी गर्दी राहते.
ढाब्यांवर अवैध विक्री
महामार्गालगत व इतर मार्गावरील ढाब्यांवर जेवणासाठी ग्राहक जातात, पण बियरबार बंद असल्याने संबंधित ढाब्यांवरही अवैध दारू विक्री वाढली आहे. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी उत्पादन शुल्क व इतर यंत्रणा अपु:या पडत असल्याचेही चित्र आहे.
पान, शेंगदाणा, चिवडा पॅकेट्सला मागणी कमी
पान, शेंदगाणा, चिवडा आदी विक्रेते बियरबारनजीक मोठय़ा संख्येने आहेत. पण सध्या बियरबार बंद असल्याने पान, चिवडा व शेंगदाणा विक्रेत्यांनाही फटका बसत आहे. तळीरामांकडून चिवडा, शेंगदाणा पॅकेट्ना अधिक मागणी असते, अशी माहिती मिळाली.
मांसाहारही घटला
बियरबारमध्ये मांसाहारी जेवणाचीही व्यवस्था असायची, पण आता बियरबारमध्ये दारू नसल्याने फक्त जेवणासाठी येणा:या ग्राहकांची संख्या फारशी नाही. ही संख्या रोडावल्याने मांसाहाराचे प्रमाणही घटले आहे. अगदी ग्रामीण भागातही मांसाहाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटल्याची माहिती आहे.