कासोदा : गेली तीन दशके प्रचंड पाणीटंचाईचा सामना करणा:या एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठय़ा कासोदा या गावी पाणीटंचाई मिटणार असल्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. सुमारे 11 कोटी रुपयांची कायमस्वरूपी पाणी योजना होणार आहे. मात्र या योजनेचे श्रेय घेण्यावरून सध्या आमदार डॉ.सतीश पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्जवला पाटील यांचे पती मच्छिद्र पाटील यांच्यात जुंपली आहे. ग्रामस्थांना या योजनेतून पाणी उपलब्ध होण्यास किमान दोन वर्षे तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या कार्यकाळात ही योजना 16 कोटींची होती. त्यात लोकवर्गणी व जलशुद्धीकरण प्रकल्पाची जागा यासह ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी विस्तृत माहिती दिली होती. परंतु नंतर ही योजना काही कारणास्तव बारगळली. आता आमदार सतीश पाटील यांनी 11 कोटी रुपयांची मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाल्याची माहिती पत्रपरिषद घेऊन दिली, तर मंत्रालयातून मंजुरीचे पत्र मी आणले, अशी भूमिका मच्छिंद्र पाटील यांची आहे. या योजनेत ग्रामसचिवालयाच्या इमारतीमागे जलशुद्धीकरण प्रकल्प होणार आहे. वाढीव उपनगरे व येत्या 5 ते 10 वर्षात गावाचा होणारा विस्तार याचाही योजना राबवताना विचार व्हावा, अशी अपेक्षा मात्र जाणकारांतून व्यक्त होत आहे. 11 कोटी रुपयांच्या या पाणी योजनेत जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे, अंजनी धरणावरून कासोदा गावार्पयत पाईप लाईन टाकणे, उपनगरासह संपूर्ण गावातील जुनी पाईप लाईन बदलून नवीन टाकणे व चार ठिकाणी जलकुंभ उभारणे अशी ही पाणीपुरवठा योजना आहे. हल्ली सोळा गाव योजना व अंजनी धरणातून गावाला पाणीपुरवठा होत आहे. मात्र अंजनी धरणातील पाणीपातळी झपाटय़ाने कमी होत असल्याने वीजपंप उचलून पाणी जेथे आहे तेथे नेले जात आहेत. गेल्या वर्षी अशीच कसरत करावी लागली होती. यंदाही तसेच करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रय} सुरू आहे. -मंगला राक्षे, सरपंच, कासोदा, ता.एरंडोल
पाणी योजनेच्या श्रेयावरून जुंपली
By admin | Published: May 05, 2017 12:12 AM