यावल, जि.जळगाव : येथील पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी जलशक्ती अभियानासंदर्भात केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव राजेश गुप्ता यांच्या अध्यतेखाली व अभियानाचे समन्वयक तथा जिल्हा कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत जिल्ह्यातील रावेर-यावल तालुक्याची घटलेली पाणी पातळी उंचावण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर सविस्तर चर्चा झाली.जिल्ह्यातील रावेर-यावल तालुक्यातील जलपातळी सतत खालावत आहे. ती उंचावण्यासाठी तालुक्यातील नागरिक , विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, तसेच राज्य व केंद्र शासनाच्या समन्वयातून काय उपाययोजना करता येतील यावर विविध घटकांशी चर्चा केली. शेतकरी तसेच सामाजिक संस्थांंची मते जाणून घेतली.अभियानाचे समन्वयक तथा कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, देशातील ३६ राज्यातील १५०० दुष्काळग्रस्त तालुके त्यात राज्यातील आठ जिल्ह्यांमधील पाणी समस्या बिकट असल्याने त्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी जलशक्ती अभियान राबविले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव राजेश गुप्ता हे विविध घटकांची मते जाणून केंद्र शासनास अहवाल सादर करणार आहेत. जिल्ह्यात रावेर-यावल तालुक्याची पाणीपातळी दरवर्षी एक-एक मीटरने खालावत असल्याने ही चिंतनीय बाब आहे. ती उंचावण्यासाठी नागरिक व सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या माध्यमातून शेततळे, वनतळे, वृक्षारोपण, विहीर पुनर्भरण, विविध प्रकल्पातील गाळ काढणे यासारख्या योजना राबविण्यासाठी चर्चा असल्याचे सांगितले.
यावलला केंद्रीय सचिवांच्या उपस्थितीत जलअभियान कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 3:31 PM
जलशक्ती अभियानासंदर्भात केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव राजेश गुप्ता यांच्या अध्यतेखाली व अभियानाचे समन्वयक तथा जिल्हा कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा पार पडली.
ठळक मुद्देरावेर-यावल तालुक्याची पाणीपातळी उंचावण्यासाठी विविध घटकांशी चर्चाउपाययोजनांवर झाली चर्चा