आॅनलाईन लोकमतभडगाव,दि.२ : श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्टानतर्फे भडगाव परीसरातील रस्त्यालगत ३०० वृक्षांचे वृक्षसंवर्धन व संगोपन करीत आहेत. भर उन्हाळ्यात वृक्षांना टँकरने पाणी टाकून सेवेकरी बांधवांतर्फे त्यांचे संगोपन केले जात आहे.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग जि.रायगङ यांच्या सौजन्याने वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन अभियानांतर्गत भडगाव ते कोठली रस्ता, भडगाव ते जुना पिंपळगाव बुद्रुक रस्ता, भडगाव ते पाचोरा रस्ता असे प्रत्येक रस्त्याला १०० प्रमाणे एकुण ३०० वृक्ष लागवड दोन वर्षांपूर्वी सेवेकऱ्यांनी केली होती. रस्त्यालगत खड्डे खोदून वृक्ष लागवड करण्यात आली.यात लिंब, चिंच , वड, गुलमोहोर, निलगीरी, चिंचोला, गुलमोहोर, शिसम यासह वृक्षांची लागवड करण्यात आली होती. या वृक्षांना खते, टँकरने पाणी घालणे, आळे स्वच्छ करणे, निगा ठेवणे, काटेरी वा संरक्षणासाठी लोखंडी जाळी बसविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वच झाडे डेरेदारपणे उंच वाढत आहेत. झाडांना पंधरा दिवसात टँंकरने पाणी टाकले जात आहे. तसेच झाडांची छाटणी , निगा, काटेरी कुंपण करणे अशी श्रमाची कामे सेवेकरी करीत आहेत. ही झाडे वाढल्यानंतर भडगाव ते कोठली रस्ता, भडगाव ते जुना पिंपळगाव बुद्रुक रस्ता, भडगाव ते पाचोरा रस्त्यालगत हिरव्या झाडांमुळे निसर्गमय वातावरण निर्मिती होणार आहे.
भडगाव येथे टँकरने पाणी टाकत वृक्षांचे संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 10:18 PM
नानासाहेब प्रतिष्ठानतर्फे ३०० वृक्षांचे संगोपन
ठळक मुद्देप्रत्येक रस्त्याला १०० प्रमाणे एकुण ३०० वृक्ष लागवडउन्हाळ्यात वृक्षांना टँकरने पाणी टाकून केले जातेय संगोपन१५ दिवसाआड टँकरने पाणी टाकून संगोपन