खडकदेवळा ता.पाचोरा : पाचोरा तालुक्यातील हिवरा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी दिलेला लाखो रुपयाचा निधी केवळ गाळ काढणे व इतर थातूरमातूर कामात वापरला आहे. जीर्ण झालेल्या कॅनालची गळती व दुरवस्थेमुळे लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. हिवरा मध्यम प्रकल्पाच्या कालवा देखभाल दुरुस्तीसाठी मिळणा:या निधीतून जी कामे होतात ती कालव्याला पूरक अशी कामे होतच नाही. केवळ गाळ काढणे हेच काम कसेबसे उरकले जाते. कोठे गाळ काढला तर कोठे तसाच राहून जातो. कोठे कालव्यातील झाडेझुडुपे तोडली जातात तर काही ठिकाणी तशीच ठेवली जातात. पाटचा:यांची मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. कालवा दुरुस्तीचे काम होत नाही त्यामुळेच आज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. धरणात 47.20 टक्के जलसाठाया प्रकल्पातून 19 डिसेंबर 2016 रोजी सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले. यावेळी जलसाठा 67.30 टक्के होता. आजमितीला या धरणात 47.20 टक्के जलसाठा आहे. पिण्याच्या पाण्यासाठी 35 टक्के जलसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. सिंचनासाठी या धरणातून तीन आवर्तने सोडली जाणार आहे. (वार्ताहर)अनेक वर्षापासून कालव्याचे लिकेज आहे. त्यासाठी वाढीव निधीची आवश्यकता आहे. कालव्याचा भराव करुन लाईनिंगची कामे झाली पाहिजेत. यासाठी पाठपुरावा सुरु आहे. जुलैअखेर पाणी शिल्लक राहिल्यास जलाशय उपशासाठी परवानगी दिली जाईल. सिंचनासाठी तीन आवर्तने दिली जाणार आहेत. - सुभाष मोरे,शाखा अभियंता, हिवरा मध्यम प्रकल्पकॅनाल गळतीचा फटका रहिवाशांनाही..हिवरा मध्यम प्रकल्पाच्या कॅनाल गळतीमुळे मोठय़ा प्रमाणावर रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरत असल्याने घराच्या भिंती पडण्याच्या मार्गावर आहे तर काही जीर्णावस्थेत आल्या आहेत. हा त्रास अनेक दिवसापासून होत आहे. शिवाय आजाराचे प्रमाणही वाढले आहे. गावाला पाणीपुरवठा करणा:या विहिरीत देखील हे दूषित पाणी जात आहे. त्यामुळ साथीचे आजारही वाढले आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरुन चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
कालव्याच्या गळतीमुळे पाण्याची नासाडी
By admin | Published: January 12, 2017 1:00 AM