जळगाव : शहरातील औद्योगिक पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या़ या घटनांमधील संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला होता़ असा दोन्ही घटनांमधील हस्तगत एकूण १२ लाख ८८ हजारांचा एकूण मुद्देमाल शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशान्वये मूळ फिर्यादींना परत देण्यात आला़ अनेक दिवसानंतर चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादींच्या चेहºयावर आनंद झळकला होता़ पुष्पा शामसुंदर चक्रवर्ती रा़ नवीपेठ, यांच्या घरून चोरट्यांनी दागिन्यांसह रोख दोन लाख असा एकूण ८ लाख १० हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना १७ जून २०१६ रोजी उघडकीस होती़ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले व कर्मचाºयांनी आबा सोनवणे रा़ गेंदालाल मिल, मनोज कोळी, दत्तू पाटील दोघे रा़विठ्ठलपेठ यांना अटक करून त्यांच्याकडून ६ लाख ८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़ अस्कानगर येथील प्रा़ शेख मोहम्मद इकबाल शेख उस्मान यांच्या बंद घरातून चोरट्यांनी ६ लाख ८० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड व बिस्कीट लांबविले होते़ यात पोलीस निरीक्षक सुनील कुºहाडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल व कर्मचाºयांनी रईस खान, इरफान खान, मोहसीन शेख उर्फ दत्ता हमीद शेख या तिघांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला होता़दोन्ही घटनांमधील फिर्यादींना २३ रोजी जप्त मुद्देमाल परत करण्यात यावा असे न्यायालयाचे आदेश होते़ त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ़जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते फिर्यादींना मुद्देमाल परत करण्यात आला़ डीवाएसपी सचिन सांगळे, पोलीस निरी क्षक सुनील कुराडे, प्रदीप ठाकूर यांचीही उपस्थिती होती़रेल्वे पोलिसांसोबत बैठक होणारतपास करून फिर्यादींना दागिने मिळवून दिल्याने त्यांचा आनंद एखाद्या पुरस्कारापेक्षा कमी नाही, असे सुपेकर यावेळी म्हणाले. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल तसेच जिल्हा पोलीस यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने घरफोडी तसेच चोरीतील आरोपींना पकडण्यास अडचणी निर्माण होतात़ या पार्श्वभूमिवर लवकरच रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल तसेच शहर पोलीस ठाणे यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे डीवाएसपी सचिन सांगळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़
चोरीस गेलेले दागिने मिळाल्याने डोळ्यात आले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 12:31 AM