यावर्षी दमदार पावसाचे संकेत लक्षात घेता या कार्यालयात असलेले अनेक वर्षांपासूनचे पुरातन दाखल्यांसह इतर रेकॉर्ड असुरक्षित झाले आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून मुख्य कार्यालयाच्या इमारतीमागे प्रशासकीय इमारत काढण्यात आली असून या इमारतीचे काम अजून अपूर्ण असले तरी याठिकाणी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे कार्यालय काही महिन्यापूर्वीच स्थलांतरित करण्यात आले आहे.
या कार्यालयास पाच ते सहा मोठ्या खिडक्या आहेत. मात्र या खिडक्यांना ठेकेदाराने दरवाजेच बसविलेले नाहीत. तीन महिने कडक उन्हाळा असताना येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कडक उन्हाच्या झळा सोसत कसेबसे दिवस काढले. मात्र, आता पावसाळ्याच्या दिवसात वादळ आणि जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता कार्यालय व येथील रेकॉर्ड संकटात सापडले आहे. पहिल्याच पावसात खिडक्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने बरेच साहित्य व रेकॉर्ड ओले झाले. या कार्यालयात अनेक ज्येष्ठ नागरिकांचे मोडी लिपीपासून दाखले असून कुणालाही केव्हाही गरज भासल्यास ते दाखले घेण्यासाठी कार्यालयात येत असतात. तसेच न. प. शिक्षण मंडळासह इतर खाजगी प्राथमिक शाळांचे रेकॉर्डदेखील या कार्यालयात असते.
कार्यालयास खिडक्या लावाव्यात, यासाठी शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व अधिकारी अनेक महिन्यांपासून पालिकेकडे व संबंधित ठेकेदाराकडे तगादा लावत आहेत. ठेकेदार मात्र या छोट्या कामाला देखील ठेंगा दाखवीत आहे. कार्यालायमागे घाणदेखील असल्याने नेहमीच येथे दुर्गंधी असते. कदाचित रात्रीच्या वेळी कर्मचारी नसताना वादळी पाऊस झाल्यास येथील रेकाॅर्ड धोक्यात असून तसे झाल्यास यास जबाबदार कोण राहणार? हादेखील प्रश्न आहे. याचे गांभीर्य लक्षात घेता, या कार्यालयास त्वरित खिडक्या लावाव्यात, अशी मागणी शिक्षण मंडळाचे सभापती नितीन निळे व उपसभापती चेतन राजपूत यांनी केली आहे.
===Photopath===
070621\07jal_12_07062021_12.jpg
===Caption===
नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या कार्यालयात पहिल्या पावसात पाणीच पाणी