शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

तोंडापूर धरणातून दिवसाढवळ्या शेतकऱ्यांकडून पाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 6:29 PM

जामनेर तालुक्यातील तोंडापूर धरणाच्या भिंतीला भगदाड पाडून पिकांना पाणी देण्याचा उद्योग काही शेतकºयांनी सुरू केला असून अधिकारी, कर्मचाºयांनी मात्र डोळ्यांवर कातडे पांघरले आहे. याबाबत संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देधरणाच्या भिंतीला गुपचूपपणे पाडले भगदाडतोंडापूर धरणातून होतो अजिंठा लेणीला पाणी पुरवठा.धरणात केवळ नऊ टक्के जलसाठा शिल्लक.

लोकमत आॅनलाईनतोंडापूर ता. जामनेर, दि.२० : मे महिन्यातील कडक ऊन आणि त्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या संपूर्ण जिल्ह्यात भेडसावत आहे. पाण्यासाठी शहरी आणि ग्रामीण जनता वणवण भटकत आहे, अशा कठीण वातावरणात तोंडापूर येथील काही शेतकºयांना मात्र आपली पिके वाचविण्याची फिकीर पडली आहे. त्यासाठी त्यांनी तोंडापूर धरणाच्या भिंतीला भगदाड पाडून पाणी चोरण्याचा संतापजनक प्रकार निदर्शनास आला आहे. तथापि धरणावरील अधिकारी आणि कर्मचाºयांनी याबाबत डोळ्यांवर कातडे पांघरल्यामुळे बिनबोभाट हा गोरखधंदा सुरु आहे.तोंडापूर तेथील मध्यम प्रकल्पात सद्या मृतसाठा सोडून केवळ नऊच टक्के जलसाठा शिल्लक असतांना दहा ते पंधरा शेतकºयांकडून पाईपलाईन टाकून धरणातून पाणी उचलून त्याचा वापर शेतीसाठी सुरू केला आहे. धरणाच्या पाण्यात विद्युत पंप (पाणबुडी) बसवून आणि कोणाच्याही नजरेस पडू नये म्हणून पाईप व वायर जमीनीत गाडून पाणी चोरण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि राजरोसपणे सुरू असलेल्या या पाणी चोरीकडे शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.अजिंठा लेणीसाठी याच धरणातून राखीव असलेल्या साठ्यातून पाण्याचा पुरवठा केला जातो. तर तोंडापूर गावात सद्या पाण्याची भीषण समस्या असतांना गावातीलच दहा ते पंधरा शेतकºयांनी धरणाची सहजासहजी नजरेस येणार नाही, अशा ठिकाणी भिंत फोडून पाईपलाईन केल्याचे निदर्शनास आले.पगारी कर्मचाºयांकडून दूर्लक्षशासनाने या धरणाच्या निगराणीसाठी तीन कर्मचाºयांना पगारी नियुक्त केले असले तरी हे कर्मचारी धरणाकडे फिरकूनही पाहत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.दरम्यान, या पाणी चोरीबाबत सिंचन विभागाचे कर्मचारी शंकर निकम यांच्याशी संपर्क साधला असता शेतकºयाने फक्त पाइपलाईन धरणात नेली आहे. त्याने मोटार बसविल्यास कारवाई करु असे सांगून जुन्या शेतकºयांना परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.म्हणे कारवाई करू, पण केव्हा...?सिंचन शाखेचे अधिकारी चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, नविन पाईपलाईन टाकणाºयांना आम्ही नोटीस दिली आहे. त्यांनी वेळेत पाइप न काढल्यास आम्ही स्वत: काढून फेकू. तसेच जुन्या विद्युत पंपाचे पंचनामे केले असून शेतकºयांनी ते वेळेत न काढल्यास विद्युत पंपदेखील जप्त केले जातील. याबाबत तोंडापूरचे सरपंच प्रकाश सपकाळ यांना दोनवेळा फोनवर संपर्क केला असता त्यांनी फोनच उचलला नाही. 

टॅग्स :Waterपाणी