रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना आवाहन
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या नातलगांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी न करणे व गाडी येण्याच्या आधी स्टेशनवर ९० मिनिट आधी येण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनीच गाडीत बसण्याचे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.
तिकीट खिडक्यांची संख्या वाढविण्याची मागणी
जळगाव : सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांना फक्त आरक्षण तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश देण्यात येत असल्याने, तिकीट आरक्षणासाठी प्रवाशांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या तिकीट खिडक्यांची संख्या अपूर्ण पडत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जळगाव स्टेशनवर तिकीट खिडक्यांची संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी
जळगाव : शहरातील नवी पेठेत अनियमित साफसफाईअभावी मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने या परिसरात जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.