आॅनलाईन लोकमतपारोळा, दि.९ : आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहोत. त्यामुळे माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न जलसंपदा मंत्री गिरीश महाजन करीत आहेत. गिरणा नदीतील पाण्यासाठी जळगावात उपोषण केल्यानंतर जलसंपदा मंत्र्यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण न केल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप आमदार डॉ.सतीश पाटील यांनी सोमवारी केला.गिरणेचे पाणी बोरीत सोडावे या मागणीसाठीआमदार डॉ.सतीश पाटील यांनी सोमवारी पारोळा येथे रस्ता रोखो व जेलभरो आंदोलन केले. प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी ८ दिवसात कालवा सल्लागार समितीची तात्काळ बैठक घेऊन गिरणेचे पाणी बोरीत सोडले जाईल असे लेखी आश्वासन दिल्यावर लिंबूपाणी देऊन हे उपोषण सोडण्यात आले.आमदार डॉ.सतीश पाटील म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यात एकटा आमदार आहे. त्यामुळे माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न जलसंपदा मंत्री गिरीश महाजन करीत आहे जळगांव येथील उपोषण मागे घेताना महाजन यांनी लेखी आश्वासन देऊन कालवे सल्लागार समितीची बैठक घेऊन तात्काळ गिरणेचे पाणी बोरीत टाकण्या बाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. मात्र २ ते ३ महिने झाल्यानंतरही राजकीय द्वेषापोटी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली नाही. तसेच पाणी सोडले नाही म्हणून मला जनतेसाठी पुन्हा रस्त्यावर उतरावे लागल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात अनेक तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असताना साधी एक पाणी टंचाईची आढावा बैठक घेण्यासाठी त्यांना वेळ नाही नसल्याचे त्यांनी सांगितले.दुपारी बारा वाजता आमदार डॉ.पाटील यांच्या संपर्क कार्यालयापासून मोर्चा निघाला. महामार्गावरून जुन्या तहसील कार्यालयाच्या समोर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. याठिकाणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जि.प.सदस्य रोहन पाटील, नगरसेवक रोहन मोरे, जिल्हा सरचिटणीस मनोराज पाटील, डॉ.शांताराम पाटील, दिगंबर पाटील, एरंडोलचे डॉ.देसले, नगरसेवक मनीष पाटील यांनी शासनाच्या नाकारते पानाचा पाडा वाचला.
जलसंपदा मंत्र्यांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न : आमदार डॉ.सतीश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 6:43 PM
गिरणेचे पाणी बोरी नदीत सोडावे या मागणीसाठी पारोळा येथे रास्तारोको आंदोलन
ठळक मुद्देटंचाई आढावा बैठक घेण्यासाठी पालकमंत्र्यांना नाही वेळराजकीय द्वेषापोटी घेतली नाही कालवा सल्लागार समितीची बैठकजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न