आठ दिवसाआड नळांना पाणी : नागरिकांची प्रचंड गैरसोयभडगाव, जि. जळगाव, दि. 22 - तापमान वाढल्याने सर्वत्र पाणी टंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. 35 हजारावर लोकसंख्या असलेल्या भडगावात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपालिकेतर्फे शहरात कॉलनी भागात 8-9 दिवसाआड तर पेठ व यशवंतनगरासह काही भागात 3-4 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे, गिरणा नदीच्या आवर्तनापूर्वी कच्च्या बंधारा दुरुस्तीचे काम सुरु आहे. बंधारा दुरुस्ती अभावी गिरणेचे पाणी वाहून गेले यंदा गिरणा धरण पाण्याने चांगले भरले होते. पावसाळ्यात पुराच्या पाण्याने गिरणा नदीवरील कच्चा बंधारा फुटला होता. पावसाळ्यानंतर मागणी होवूनही न.पा.ने हा बंधारा दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. यंदा गिरणा नदीला पाण्याचे आवर्तन वेळोवेळी मिळाले मात्र दुरुस्तीअभावी पाणी न अडवल्यामुळे गिरणेवरील कच्चा बंधा:यात पाणी वाहून गेले. हा बंधारा न.पा.तर्फे पूर्वीच दुरुस्त झाला असता तर आज पाणीटंचाईला सामोरे जावे लागले नसते असे नागरिकांचे म्हणणे आहे.पाईपलाईनसाठी 1 कोटी 14 लाख निधी मंजूरनवीन कॉलनी व यशवंतनगरातील नवीन जलकुंभात पाणी येण्यासाठी 1 कोटी 14 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. हा विषय 7 एप्रिल 2017 च्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.गिरणा नदीपात्रातील नवीन पाणीपुरवठा विहिरीपासून तर यशवंतनगर नवीन जलकुंभार्पयत नवीन लोखंडी पाईप टाकले जाणार आहेत. जलकुंभापासून पाचोरा रस्त्यालगत कॉलनी भाग व बाळद रस्त्यालगत पाईपलाईनच्या वाहिन्यांनी पाण्याचे वितरण केले जाणार आहे. या कामाचे अंदाजपत्रक तयार करुन हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे, अशी माहिती पालिका लिपिक नितीन पाटील यांनी दिली.
नवीन जलकुंभार्पयत पाईपलाईनसाठी 1 कोटी 13 लाखाचा निधी मंजूर आहे. तसेच गिरणा नदीवरील कच्च्या बंधा:याचे काम सुरू असून गिरणेच्या आवर्तनापूर्वीच काम पूर्ण होईल, याकामी न.पा. निधीतून साडेनऊ लाख खर्च अपेक्षित आहे. शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठय़ाचे नियोजन आहे. - बबन तडवी, मुख्याधिकारीशहर व कॉलनी भागात 8-9 दिवसाआड पाणीपुरवठा होतो तर पेठ- यशवंतनगरात सध्या तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या कच्च्या बंधारा दुरुस्तीचे काम सुरू आहे. तसेच गिरणेवरील पक्क्या बंधा:याचा पाठपुरावा व प्रक्रिया सुरु आहे. -श्यामकांत भोसले, नगराध्यक्ष