शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

खान्देशातील सात पाणी प्रकल्पांच्या घशाला कोरड!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 5:26 PM

जळगाव जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. धुळ्यातील सोनवद आणि अमरावती प्रकल्पातही तीच स्थिती आहे.

कुंदन पाटील

जळगाव : खान्देशातील सात प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. तसेच जळगावच्या हतनूरमध्ये ४० तर गिरणा धरणात केवळ २१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मान्सून लांबल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जळगाव जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. धुळ्यातील सोनवद आणि अमरावती प्रकल्पातही तीच स्थिती आहे. मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये बुधवारी ६२३.१४ दलघमी एवढा उपयुक्त साठा शिल्लक आहे. जळगावसाठी जीवनदायी ठरणाऱ्या हतनूर आणि गिरणा धरणातील साठाही ओसरला आहे. तसेच वाघूरमध्ये ६५.६८ टक्के इतका साठा आहे. अन्य काही प्रकल्पातील साठा अतिशय नाजूक आहे. मे महिन्याच्या मध्यान्हात बहुतांशी प्रकल्पांच्या घशाला कोरड पडली आहे. मान्सून १२ जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मान्सून वेळेवर दाखल झाल्यास पाणीटंचाईसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील चाराटंचाईचाही प्रश्न सुटणार आहे.

आवर्तन जूनमध्येच१५ मेपर्यंत गिरणा धरणातून आवर्तनाची एकही मागणी आलेली नाही. तसेच बिगर सिंचनासाठी शेवटचे आवर्तन शिल्लक आहे. हे आवर्तन सुटल्यानंतर गिरणा धरणातील उपयुक्त साठा शून्यावर येणार आहे. त्यामुळे प्रशासनही ‘अलर्ट’मोडवर आहे. जून महिन्यात पाऊस लांबल्याची चिन्हे पाहून पहिल्या आठवड्यात आवर्तन सोडण्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे.

प्रकल्पनिहाय जलसाठाप्रकल्प-टक्केवारीहतनूर-४०.५९गिरणा-२१.१६वाघूर-६५.६८सुकी-६५.६०अभोरा-६७.५६तोंडापूर-१९.७५मंगरुळ-४४.५१बहुळा-१४.७८मोर-६६.६२अंजनी-३.८४गूळ-४८.८७सुलवाडे बॅरेज-३७.६४पांझरा-२४.१५मालनगाव-३३.५४जामखेडी-२७.३९कनोली-२.३७बुराई-६.४०अनेर-६०.०६करवंद-३८.७७

गिरणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. या पंधरवड्यानंतर मागणीनुसार आवर्तन सोडण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समिती घेईल.-देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.

टॅग्स :Jalgaonजळगावwater scarcityपाणी टंचाई