भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील मळगाव येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. गावात १० ते ११ दिवसाआड जेमतेम पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी नागरिकांसह गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विहीर खोलीकरण, आडवे बोअर करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे दिला आहे. पाण्याचे टँकर त्वरित सुरू करावे, अशी सातत्याने मागणी करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.प्रशासनाने तत्काळ पाणीटंचाईवर उपाय योजनाकामी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे त्वरित खोलीकरण काम करणे, विहिरीत आडवे बोअर करणे, दिवसातून पाण्याचे दोन टँकर पिण्यासाठी तत्काळ सुरु करावे, अशी रास्त मागणी मळगाव ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकातून होत आहे.भडगाव तालुक्यातील मळगाव हे छोटेसे अन् तालुक्याच्या सीमेवरचे दुर्लक्षित गाव. गावाचा परिसर बरड अन कोरडवाहू क्षेत्रात, डोंगर परिसरात वसले आहे. त्यामुळे गावाचे क्षेत्र अवर्षण प्रवर्षण भागात येते. पाण्याचे दोन पाझर तलाव आहेत. या पाझर तलावाच्या पाण्यावरच गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाऊस कमी होतो. त्यात पाझर तलावात थोडेफार पाणी साचते तेही खडकाळ व मुरुमाचा परिसर असल्याने पाझर तलावातून पाणी पाझरुन जाते. पाझर तलावात पाणी नसल्याने पाझर तलाव कोरडाठाक बनल्याचे संकटमय चित्र आहे. पाण्याचे साधन नसल्याने गावाला नेहमी पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर पाझर तलावाजवळ आहे. मात्र पाझर तलावच कोरडा पडला आहे. पाणीपुरवठा करणारी विहीर आटत आहे. विहिरीची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने विहीर कोरडे पडण्याचे संकट समोर उभे आहे.पाणीटंचाईची स्थिती पाहता ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विहिरीचे खोलीकरणाचे कामाचे व आडवे, उभे बोअर टाकणे आदी कामांचा प्रस्ताव पंचायत समिती, पाचोरा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आदींकडे दिला आहे. मात्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी प्रयत्न करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे? याबाबत नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे टँकर तत्काळ सुरू करण्याचीही मागणी आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी याकडे जिल्हाधिकारी, भडगावचे नूतन तहसीलदार गणेश मरकड, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी गावाला भेट देवून तत्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. गिरणा नदीवरुन मळगावासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव टाकला आहे. तोही वाºयावर आहे. याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पाचोरा यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकातून होताना दिसत आहे.गावाला सध्या १० ते ११ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जेमतेम पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना वणवण भटकंती करीत करावा लागत आहे. नागरिकांसह जनावरांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच गहन बनत आहे. गावातील छोटे आड कोरडे पडले. कोरडवाहू, डोंंगराळ भाग असल्याने रानावनातील विहिरीही कोरड्या पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे भटकंती करुनही पाणी मिळत नाही. गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीचीही पाणी पातळी खोलवर गेली आहे. वाढत्या तापमानाची स्थिती पाहता विहीर कोरडी पडण्याच्या वाटेवर आहे. टँकरसाठी पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नागरिक गिरणा काठावर पाणी मिळेल का पाणी यासाठी शेतकºयांना भेटताना दिसत आहेत. तरी पाणी मिळत नाही. पुढे पिण्याच्या पाण्याचे व जनावरांच्या पाणी प्रश्नाचे कसे होईल, जनावरे चारा व पाणीटंचाईत कशी पोसावीत, अशी चिंता नागरि सतावत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. यामुळे ो नाराजीचा सुर उमटत आहे. यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठा विहीर खोलीकरण, आडवे व उभे बोअर करणे कामास तत्काळ मंजुरी द्यावी. गावासाठी दोन पाण्याचे टँकर सुरू करावेत. पाणी प्रश्न सोडविण्यास मदत करावी, अशी मागणी मळगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांसह नागरिकांतून होत आहे.
भडगाव तालुक्यातील मळगाव येथे पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 8:08 PM
भडगाव तालुक्यातील मळगाव येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. गावात १० ते ११ दिवसाआड जेमतेम पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी नागरिकांसह गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देनागरिकांमध्ये संतापउपाययोजनेकामी प्रशासनाचे दुर्लक्षछोटेसे अन् तालुक्याच्या सीमेवरचे दुर्लक्षित गाव