कळमसरे, ता. अमळनेर, दि.9- पांझरा नदीचे पाणी अडविल्यावरून तांदळी-निम ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली तणावग्रस्त परिस्थिती पूर्णपणे निवळली आहे. निम व भिलाणे या दोन्ही गावांच्या बंधा:यात पाणी साठवण झाल्याने, आता किमान दोन महिने पाणी टंचाईची समस्या मिटली आहे.
पांझरा नदीत सोडण्यात आलेले पाण्याचे आवर्तन नीम व भिलाणे गावाच्या बंधा:यार्पयत पोहचले नव्हते. त्यासाठी तांदळी गावाजवळील बंधा:यात अडविलेले पाणी सोडण्यावरून दोन्ही गावांत शनिवारी तणावसदृश्य वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या उपस्थितीत 8 रोजी तांदळी बंधा:यातील पाटय़ा काढून नीम गावाकडे पाणी सोडण्यात आले होते. पांझरा नदीत असलेल्या विहिरीवरून नीम गावाला पाणी पुरवठा होता. मात्र ती विहिर आटल्याने व पर्यायी व्यवस्था नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती.आता बंधा:यात पुरेसे पाणी साठवण झाल्याने, किमान दीड ते दोन महिने पाणी टंचाई भासणार नाही, असे नीमचे सरपंच भास्कर हिरामण चौधरी, गुलाब आनंदा पाटील, अशोक नारायण कोळी, पंजू खंडू क्षिरसागर या ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान नीम बंधा:याच्या लिकेज दुरूस्तीचे काम ग्रामपंचायतीने तातडीने सुरू केले आहे. पांझरा नदीत बेटावद पुलापासून थेट शेवटच्या भिलाणे गावाच्या बंधा:यार्पयत प्रत्येक बंधारा पाण्याने पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे तूर्त पाणी टंचाईची समस्या मिटली आहे.