जिजाबराव वाघ।चाळीसगाव : 'सहा एकरात पेरलेल्या कपाशीचा साधा खर्चही पदरी पडला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी तास्नतास वाट पहावी लागते. आमच्या वाट्याला आलेले भोग संपणार आहेत की नाही ?' अंधारी गावच्या उत्तम शामराव पाटील या ५५ वर्षीय शेतक-याचा प्रश्न गावाला गिळून टाकणा-या भीषण दुष्काळाचे भयावह रुप दाखवितो. भीषण जलसंकट आणि उजाड झालेली शेती हे येथील वास्तव आहे.चाळीसगाव शहरापासून अवघ्या १८ किमी अंतरावर उत्तरेला अडीचशे उंब-यांचं अंधारी गाव दुष्काळाने वेढलेले आहे. भर पावसाळ्यातही येथे पाण्यासाठीची पायपीट थांबलेली नव्हती. यंदा पावसाने दगा दिल्याने शेतक-यांची झोळी रिकामीच राहिली.तीन हजार लोकसंख्येच्या अंधारी गावात दुष्काळाचा सन्नाटा पहावयास मिळतो. सरपंचासह नऊ सदस्यीय ग्रामपंचायत येथे आहे. वर्षातील बहुतांश दिवस या गावाला टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.
'अंधारी'त सहा महिन्यांपासून टँकरने होतोय पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 11:06 PM
जिजाबराव वाघ। चाळीसगाव : 'सहा एकरात पेरलेल्या कपाशीचा साधा खर्चही पदरी पडला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी तास्नतास वाट पहावी लागते. ...
ठळक मुद्दे७७५ हेक्टर क्षेत्रावरील खरीपाचा झाला वणवाचारा - पाण्याअभावी पशुधनाचे हाल, मजुरांचीही उपासमारदुष्काळ जाहिर झाल्याने मदतीची मागणीरोजगार हमी योजना सुरु करण्याची ग्रामस्थांकडून मागणीकपाशी, बाजरी, मका, भुईमुग पिकाची होळी