कजगाव, ता.भडगाव : गावातील पाणीप्रश्न 3-4 महिन्यांपासून बिकट झाला आहे. 15 ते 20 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विहिरीला पाणी असूनही कमी दाबाच्या वीजप्रवाहामुळे वीजपंप चालत नसल्याने पाणीपुरवठा योजना बंद स्थितीत पडली आहे.कजगावची पाणीपुरवठा योजना सावदेजवळील गिरणा नदीतून कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी योजनेची विहीर आहे. अगोदर या योजनेस कजगाव सबस्टेशनवरून वीजपुरवठा होता. दरम्यान चार-पाच महिन्यांपूर्वी लोणपिराचे येथील नवीन सबस्टेशनवरून सुरू झाल्याने कजगाव योजनेचा पाणीपुरवठा लोणपिराचे सबस्टेशनला जोडण्यात आला आणि तेव्हापासून कजगावच्या पाणीपुरवठा योजनेची घरघर सुरू झाली.कमी दाबाचा वीजपुरवठापाणीपुरवठा योजनेसाठी 35 एचपी पंप बसविण्यात आला आहे. या पंपास साधारणत: 380 ते 400 होल्टेजचा वीजपुरवठा अपेक्षित असतो तेव्हाच वीजपंप सुरळीत चालतो. मात्र या ठिकाणी जेमतेम 250 होल्टेजचा पुरवठा सुरू असल्याने 35 एचपीचा पंप सुरूच होत नसल्याने या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.वीजपुरवठा सुरळीत होणे गरजेचेकजगावची पाणीपुरवठा योजना केवळ कमी दाबाच्या वीजपुरवठय़ामुळे बारगळली आहे. यामुळे गावाला 20-20 दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. वीज कंपनीने त्वरित तांत्रिक दोष दूर करून वीजपुरवठा सुरळीत करावा.लोण सबस्टेशनलाच कमी दाबाचा वीजपुरवठालोण सबस्टेशनवरून गेल्या 4-5 महिन्यांपूर्वी कजगाव योजनेचा पुरवठा जोडण्यात आला. मात्र कमी दाबाच्या वीजपुरवठय़ामुळे योजनेचा पंपच सुरू होत नसल्याने संबंधित सबस्टेशनला अनेक वेळा विचारणा केली असता सबस्टेशनलाच कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच लोण सबस्टेशनवरून कजगाव योजनेचा सुरळीत वीजपुरवठा मिळू शकणार नसल्याचे दिसते.ग्रा.पं.कडून 100 एचपीचाट्रान्सफॉर्मर देण्याची मागणीसतत कमी दाबाच्या वीजपुरवठय़ामुळे कजगावचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे. तो सुटावा यासाठी सदर योजनेचा जेथून कार्यान्वित आहे तेथील 35 एचपीचा ट्रान्सफॉर्मर बदलवून या ठिकाणी 100 एचपीचा ट्रान्सफॉर्मर देण्यात यावा अशी मागणी कजगावच्या सरपंच लताबाई निकम यांनी वीज वितरण कंपनीकडे रीतसर पत्र देऊन केल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी आर.पी. सोनवणे यांनी दिली.42 भागात विभागून पाणीपुरवठाकजगावचा तीन विभागात पाणीपुरवठा विभागला आहे. यात स्टेशन विभागात 3 भाग, बसस्थानक ते स्टेशन 12 भाग व बसस्थानक 15 भाग आणि जुने गाव 12 भाग अशा एकूण 42 भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र योजनेचा वीजपंपच सुरळीत चालत नसल्याने सध्या एका भागास पाणी पोहचण्यासाठी जवळपास 25 ते 30 दिवस लागत असल्याने कजगावचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे.आमदारांनी लक्ष द्यावेकजगावचा पाणीप्रश्न केवळ कमी दाबाच्या वीज समस्येमुळे बिकट झाला आहे. तो सोवण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी संबंधित खात्याच्या वरिष्ठांना योग्य त्या कडक सूचना देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबतचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.वीजपुरवठा पुन्हा कजगावहून जोडावाकजगाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा लोण सबस्टेशनवरून सुरळीत होत नसल्याने तो वीजपुरवठा कजगाव सबस्टेशनवरून जोडण्यात यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.कजगावच्या पाणीपुरवठा योजनेस सुरुवातीपासूनच अडथळे आले आहेत. सदर योजनेच्या विहिरीला दगड लागल्याने गिरणेस पाणी तरच योजनेच्या विहिरीस पाणी अशी स्थिती आहे. जेव्हा गिरणा वाहते तेव्हा कधी पाईप गळती होते, तर कधी वीजपंप जळतो, कधी भारनियमन, तर कधी लाईनीत बिघाड असतो. आता तर चक्क चार महिन्यांपासून कमी दाबाचा वीजपुरवठा आणि जेव्हा गिरणेला पाणी नाही तेव्हा विहिरीला पाणी नाही. म्हणजेच कजगावच्या पाणीपुरवठा योजनेला अनेक अडथळे. यालाच म्हणतात नकटीच्या लग्नात..नागरिकांचा इशाराकमी दाबाच्या वीजप्रवाहामुळे कजगावकरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीपुरवठा योजना सुरळीत व्हावी याकरिता वीजपुरवठा सुरळीत करावा. सदरचा पुरवठा 16 फेब्रुवारीर्पयत सुरळीत न झाल्यास 25 रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रा.पं. सदस्य अनिल महाजन व युवा कार्यकत्र्यानी लोणपिराचे येथील सबस्टेशनला निवेदन देऊन दिला आहे.
4 महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत
By admin | Published: February 13, 2017 12:59 AM