पाचोरा, जि.जळगाव : शासनाच्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतून तालुक्यातील २७ पैकी १४ धरणातून हजारो ब्रास गाळ काढण्यात आल्याने या जलाशयातील साठवण क्षमतेत वाढ झाली आहे. मेरिको कंपनीच्या सीएसआर निधीतून अनुलोम संस्थेने व प्रशासनाच्या समन्वयातून जल व मृदसंधारणाचे महत्वपूर्ण काम झाले आहे. अतिशय महत्वपूर्ण ठरलेल्या या कामांपैकी कोल्हे, ता.पाचोरा येथे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.प्रांताधिकारी राजेंद्र कचर,े मेरिको कंपनीचे प्लांट हेड प्रसाद काळे, सीएसआर प्रमुख अंजली शर्मा तहसीलदार कैलास चावडे, अनुलोम जिल्हा जनसेवक दत्ता नाईक, विकास लोहार, पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सपोनि बागुल, मंडळ अधिकारी विनोद कुमावत, सरपंच सरला रमेश बाफना व्यासपीठावर उपस्थित होते.जलपूजनानंतर बाफना विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आणि भारत माता पूजनाने सुरुवात करण्यात आली. यावेळीअनुलोमचे जिल्हा जनसेवक दत्ता नाईक यांनी अनुलोमच्या कार्याविषयी माहिती सांगितली, तर मेरिको कंपनीचे प्रसाद काळे आणि प्रोजेक्ट जलाशय प्रमुख अंकिता शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, या कार्यासाठी महत्वपूर्ण योगदान असलेले अनुलोमचे भाग जनसेवक विकास लोहार, पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रतीक घुगे, सरपंच सरला बाफना, पोलीस पाटील अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य लतिफा तडवी, मंगला माळी, वैजयंता सोमवंशी, समीर शिंदे, योगेश गायकवाड, जेसीबी मालक सूर्यभान गवळी यासह घेऊन जाणारे लाभधारकांदेखील सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना लाभार्थी तसेच आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थी यांनादेखील जिल्हाधिकाºयांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी, तर सर्वेश कुलकर्णी यांनी आभार मानले.
पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 10:56 PM
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतून तालुक्यातील २७ पैकी १४ धरणातून हजारो ब्रास गाळ काढण्यात आल्याने या जलाशयातील साठवण क्षमतेत वाढ झाली आहे.
ठळक मुद्दे२७ पैकी १४ धरणातून हजारो ब्रास गाळ काढल्याने साठवण क्षमतेत वाढयोगदान देणाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान