शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

बोदवड शहरासह ८० गावात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:18 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बोदवड , जि.जळगाव : ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बोदवड तालुक्यासह भुसावळ, मुक्ताईनगरच्या ओडीएच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ...

ठळक मुद्देअजून आठ दिवस पाणीपुरवठा होणे अशक्यपाण्यासाठी दुष्काळात वसुली सुरू, साडेसहा लाख गोळालोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबोदवड, जि.जळगाव : ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बोदवड तालुक्यासह भुसावळ, मुक्ताईनगरच्या ओडीएच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना बसत आहेत. अजून किमान आठ दिवस ओडीएचा पाणीपुरवठा सुरू होणे अशक्य आहे.१२ रोजी बोदवड, मुक्ताईनगर व भुसावळ या तिन्ही तालुक्यातील ८० गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा (ओडीए) योजनेचे वीज बिल थकल्याने कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तर बिल भरण्यास जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे निधी नसल्याने या योजनेच्या संबंधित गावांना पाणीपट्टी वसुली करून निधी गोळा करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार ते कामाला लागले आहेत.आजपावेतो बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ यांनी बोदवड तालुक्यातील राजूर, कोल्हाडी, निमखेड, जामठी, शेलवड, विचवा, येवती या गावातून एक लाख २५ हजार गोळा करून जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा केले आहेत, तर बोदवड नगर पंचायतीने पाच लाखांचा धनादेश दिल्याचे कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण यांनी सांगितले. असे एकूण सहा लाख २५ हजार अद्यापपावेतो जमा झाले आहेत. अजून पाणीपट्टी गोळा करणे सुरू असल्याचे गटविकास अधिकारी वाघ यांनी सांगितले.१६ रोजी ओडीएच्या जलशुद्धीकरणच्या सारोळा केंद्रावरून वीजपुरवठा खंडित असल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीचे रोहित्र चोरून नेल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे. आजघडीला बोदवड शहरात १७ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. ९० टक्के ओडीएच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बोदवड शहरात काही प्रभागात १७ ते १८ दिवस उलटत आले आहेत. नळाला पाणी आले नाही तर नगरपंचायत शहरातील विहिरीचे पाणी गोळा करून पुरवत आहे. पण या विहिरीच्या पाण्यावर शहराची तहान दोन महिनेही सलग भागणे अवघड आहे.सोशल मीडियावर मात्र राजकारण सुरू झाले, पण पाण्यासाठी कोणीच पुढे येण्यास तयार नाही. लोक प्रतिनधींनाही पाणी टंचाईबाबत काहीच घेणे-देणे नसल्याचे चित्र दिसत आहे.१० दिवस उलटूनही जलसंपदा मंत्र्यांच्या जिल्ह्यातील ८० गावे पाण्यासाठी वणवण करीत आहे, तर लोकप्रतिनिधीही गप्प का, हे समजेनासे झाले आहे, तर खासदारही पाहण्यास तयार नाही व नागरिक घटकाभर पाण्यासाठी कासावीस होत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला जिल्हा परिषदेचे साकडे, बैठक निष्फळओडीएचे चोरीस गेलेले रोहित्र घेण्यासाठी व या योजनेचे थकीत बिल भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अधिकारी (अभियंता) साधना नरवाडे यांनी १९ रोजी नाशिक येथील जीवन प्राधिकरण कार्यालय गाठले. वरिष्ठांना या योजनेचे रोहित्र चोरीस गेले असून, नवीन रोहित्र अथवा दुरुस्तीसाठी व वीज बिलसाठी साकडे घातले. परंतु त्यांनीही सदर नवीन रोहित्रासाठी टंचाईच्या निधीत मागणी करावी, असे सांगून जीवन प्राधिकरणकडे तजवीजसाठी नकार दिला आहे. आता टंचाईग्रस्त निधीत जिल्हा परिषद रोहित्रसाठी निधी मागणार असल्याचे या योजनेच्या कार्यकारी अधिकारी साधना नरवाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.अडीअडचणीटंचाईग्रस्तमधून निधी मिळाला तरी या योजनेसाठी लागणारे ३१५ अश्वशक्तीचे रोहित्र वीज वितरण कंपनीकडे नाही. यासाठी टेंडर करावे लागेल तोपर्यंत वीज बिल भरूनही फायदा नाही, तर नवीन रोहित्र किती दिवसात मिळते यावर सर्व अवलंबून आहे. तोपर्यंत पाणी मिळणे अशक्य आहे तर पाण्यासाठी नागरिक पायपिट करीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBodwadबोदवड