शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही जग सोडून जात आहोत - पत्नीच्या नावे सोडली चिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 1:14 PM

पती, सासू, सासरे बेपत्ता प्रकरण

जळगाव : आमचा तपास करू नकोस़़़आम्ही मेलो असे पत्नीला लिहिलेल्या चिठ्ठीनंतर पती, सासू आणि सासरे कुठे गेले याबाबत कुठलीच माहिती मिळत नसल्याने तर्क विर्तक लढविले जात आहे. यातच दीपकचा मोबाईल बंद येत असल्याने या चर्चेत अधिकच भर पडत आहे.दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, रुपालीचे सासू-सासरे हे ११ रोजी यावल तालुक्यातील चिंचोली येथे लग्नाला गेले होते. दीपक हा कंपनीत कामाला गेला असल्यामुळे घराला कुलूप होते़ नंतर १३ रोजी मावस बहिणीच्या हळदीच्या दिवशी दीपक हा पत्नीसोबत कपडे घेण्यासाठी घरी आला. त्यावेळी सासू घरी आलेल्या होत्या़ त्यानंतर सकाळी ८.३० वाजता दीपक हा पत्नीला तूु हळदीला जा मी सायंकाळी येतो, असे सांगून कामावर निघून गेला. दीपक सायंकाळी धरणगाव येथे हळदीला जाणार होता. परंतू, पती अजूनही हळदीच्या कार्यक्रमाला आले नसल्याने रूपाली हिने फोन केला, मात्र तो बंद येत होता़वडीलांसह रूपालीने गाठले घरपती दीपक हा हळदीच्या ठिकाणी न आल्याने रूपाली हिने दुसऱ्या दिवशी पिंप्राळा येथे माहेरी येऊन वडीलांसह श्रीधरनगर गाठले़ मात्ऱ़़त्याठिकाणी त्यांना घराला कुलूप लागलेले दिसून आले़ पती दीपक व सासु-सासरे बाहेर गेले असतील म्हणून ती पुन्हा लग्नाठिकाणी निघून गेली़संपर्क साधण्याचा प्रयत्ऩ़़ मात्र फोन लागेना!धरणगाव येथील लग्नसाहेळा मंगळवारी आटोपल्यानंतर रूपाली ही रात्री ८़३० वाजता पिंप्राळा येथे माहेरी आली़ लग्नाला पती न आल्यामुळे तिने लागलीच दीपक याला फोन केला़ मात्र, फोन लागत नव्हता़ वारंवार प्रयत्न करून सुध्दा फोन बंद येत होता़ अखेर तिने संपूर्ण प्रकार हा चुलत सासरे ज्ञानेश्वर सोनगीरे यांना सांगितला आणि घरी जावून पाहणी करण्यास सांगितले़ ज्ञानेश्वर हे सुध्दा श्रीधरनगरात गेले असताना त्यांना घराला कुलूप दिसले़ ही बाब त्यांनी रूपालीला कळविली़ बुधवारी अखेर रूपाली हिने वडीलांसह घर गाठले आणि दुसºया चावीने घर उघडले़ त्यावेळी घरात कुणीही दिसून आले नाही़डायरीसह पोलीस ठाण्यात धावडायरीवर लिहिलेला मजकूर पाहून घाबरलेल्या रूपालीने वडीलांसह रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली़ घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला़ तसेच ती डायरी सुध्दा पोलिसांकडे दिली़ रूपाली सोनगीरे हिच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात पती, व सासु-सासरे बेपत्ता झाल्याची नोंद घेण्यात आली आहे़ पुढील तपास विजय निकुंभ करीत आहेत़ दरम्यान, तिघे कोठे गेले हे अद्याप कळाले नसून घर सोडून जाण्यास मागचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे़ याचा शोध पोलीस घेत आहेत़रुपाली सोनगिरेने दिलेली डायरी पोलिसांनी केली जप्तरूपालीने दुसºया चावीने घर उघडताच़़़तिला पलंगावर तिची डायरी दिसली़ त्यामध्ये एका पानावर तुझ्या इच्छेप्रमाणे मी आणि आई-वडील आम्ही हे जग सोडून जात आहोत, तुझी ईच्छा पूर्ण होवो़ ही सदिच्छा़़़ तुझा आणि फक्त तुझाच दीपक़ कृपया आमचा तपास करून नकोस आम्ही मेलो तुला सोडून, असा मजुकर त्यामध्ये लिहिलेला आढळून आला़ तसेच घरातील काही कपडे आणि मोबाईल,चार्जर सुध्दा दिसले नाही़ अखेर पती, आई-वडीलांसह घरातून कोठेतरी निघून गेल्याची खात्री तिला झाली़

टॅग्स :Jalgaonजळगाव