अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे आहे. आतापर्यंत अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नाही. तसेच असे जर का कोणी करत असेल तर तेही चुकीचे आहे. मात्र एखाद्या रुग्णाने लस घेतल्यानंतर डॉक्टरांकडे त्रास झाल्याचे सांगितले असेल तर त्या रुग्णाला काही औषधउपचार लिहून दिला असू शकतो. मात्र आमच्याच मेडिकल वरून हे औषधी घ्या असा कोणताही डॉक्टर सांगणार नाही.
- डॉ. स्नेहल फेगडे, अध्यक्ष, आयएमए
आमच्याकडे गेल्या चार ते पाच दिवसांपासून लसीकरणात सुरुवात झाली आहे. मात्र काहीजणांना प्रिस्क्रिप्शन ठराविक औषधांसाठी दिले जात आहे. मात्र ती औषधी आमच्याच मेडिकल वरून घ्यावी असं कोणतेही बंधन रुग्णांना घालण्यात येत नाही. लसीकरणाचे काम आम्ही राष्ट्रीय कर्तव्य म्हणूनच पार पाडत आहोत. एखाद्या रुग्णाला जर लस घेतल्यानंतर त्रास होत असेल तर त्याला काही औषधी लिहून दिली जाते.
- डॉ. रेखा महाजन, महाजन हॉस्पिटल