कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर,उपप्राचार्य डॉ. पी. एस. बाविस्कर,आयक्वेसी समन्वयक व उपप्राचार्य डॉ. काटे, डॉ. शशिकांत खलाणे, तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. एल. व्ही. उपाध्ये आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. मार्गदर्शक डॉ. शशिकांत खलाणे यांनी संपूर्ण मार्गदर्शनात ताणतणावाबद्दल सविस्तर चर्चा केली. ताणाचे प्रकार, ताणाची कारणे, ताणाचे परिणाम व ताणाचे नियोजन करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत. जसे ताण निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने बघावे, कामाच्या वेळेचं योग्य नियोजन करणे, ध्यानधारणा, व्यायाम, सकस आहार तसेच कामाच्या प्रती जबाबदारीची जाणीव ठेवून आपल्या कामाशी प्रामाणिक असणे किती गरजेचे आहे, अशा विविध विषयांवर सविस्तर
चर्चा केली.
सूत्रसंचालन व आभार प्रा. सुनीता जगताप यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. किशोर पाटील व दीपाली बन्सल यांनी विशेष सहकार्य केले.