हरताळा, ता. मुक्ताईनगर : तलावाला काटेरी बाबर या झुडपांनी व्यापले आहे. यामुळे गावाचा दर्शनी भागच विद्रुप दिसत आहे. या तलावाकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. येथूनच हाकेच्या अंतरावर शिवशक्ती भवानी माता मंदिर आहे. आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवातील भाविकांची मंदिरावर ये-जा करतात . तलाव किनारी असलेली काटेरी झुडपे व वाढलेले तरोटा गावत साफ करून भाविकांची अडचण दूर करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहे.गेल्या सहा-सात वर्षात ठणठणाट असलेल्या तलावात आता निसर्गाच्या कृपेमुळेमागील वषार्पासून तलाव तुडुंब भरला आहे. त्याचे संगोपन करणे हे काळाची गरज असताना मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.यंदाच्या पावसाने तलाव चागला भरला असून तलावाच्या चारही बाजूंनी काटेरी झुडपांचा वेढला आहे. दरवर्षी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत येथे भराव टाकला जायचा मात्र गेल्या काही वषार्पासून भरावाचे ही काम होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावर दगडांची पिंचींग केलेली संपूर्ण नेस्तनाबूत झालेली आहे पुन्हा येथे पिचिंग करावी अशी मागणी आहे. याचबरोबर किनारी उगवलेले गाजर गवत तसेच वेली व काटेरी झुडपे वाढून पाण्यात गेल्याने पाणीही दुषित होत आहे महिलांना कपडे धुण्यासाठी लांब पाणवठ्यावर जावे लागत आहे.यापूर्वीसुद्धा वेळोवेळी तलावाच्या दूर्दशेविषयी संबंधित विभागाला माहिती कळविली असून कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त होत आहे.ग्रामपंचायतचे कानावर हातग्रामपंचायतीला याचे कोणतेही उत्पन्न नसल्याने ग्रामपंचायतीने मात्र कानावर हात ठेवले आहे. आता पर्यटन विभाग व पाटबंधारे विभागाने तलावाचे सौंदर्य खुलविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
हरताळे तलावाला काटेरी झुडपांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 10:17 PM