ऑनलाईन लोकमत
यावल,दि.23-स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावल नगरपालिकेच्या वतीने उघडय़ावर शौचास बसणा:यांचे मंगळवारी पहाटे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आल़े
शहरातील बोरावल गेट परीसर, भुसावळ रस्त्यावरील आई हॉस्पीटल, आठवडे बाजार परीसर, सुतगिरणी रस्ता यासह विविध रस्त्यावर नागरिक उघडय़ावर शौचास बसत असल्याने शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आह़े भारत स्वच्छता अभियानांतर्गत पालिकेने वेळोवेळी जनजागृती करूनही उपयोग होत नसल्याने भल्या पहाटे पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी करण्यात आली़
नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या नेतृत्वाखाली महिला नगरसेविका पथक तर नगरसेवक दीपक बेहेडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक पथक तयार करण्यात आले आह़े
दोन्ही पथकाने सुमारे 15 जणांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल़े मंगळवारी भल्या पहाटे पाच वाजेपासून गांधीगिरी करण्यास सुरुवात झाली़ बुधवारीदेखील मोहिम राबवली जाणार आह़े नागरिकांनी शौचालय बांधावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आह़े पुढच्या टप्प्यात उघडय़ावर शौचास बसणा:यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आह़े मोहिम तीव्र करण्यात येणार असल्याचे पालिकेचे स्वच्छता अधिकारी रमाकांत मोरे यांनी सांगितल़े