धरणगाव : तालुक्यातील साकरे येथील बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालयातील इ. ८ वी, ९ वी व १० वीचे वर्ग १५ जुलै रोजी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून सुरू करण्यात आले.
शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये सॅनिटायझर फवारण्यात आले तसेच शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला. मुलांचे सॅनिटाइजेशन करून, त्यांच्या शरीराचे तापमान मोजून वर्गात प्रवेश देण्यात आला. तसेच सर्व शिक्षकांनी आरटीपीसीआर टेस्ट करून घेतल्या. घड्याळी तीन तास मुलांना इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांचे अध्यापन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी पाहून म्हणावेसे वाटते की,"इथेच रुजली, इथेच फुलली, कालची रोपे इवली ! उजाड रानी नंदनवनीची, देवी शारदा जणू अवतरली !!" यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : शाळेत आनंदी वातावरणात उपस्थित विद्यार्थी.
छाया आर. डी. महाजन