कु:हाड, ता.पाचोरा : पाणीटंचाईने त्रस्त आणि संतप्त झालेल्या येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी सरपंचाच्या घरी व त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली. दहा हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या कु:हाड खुर्द येथे गेल्या पंधरा दिवसांपासून नळांना पाणी येत नसल्याने व या परिसरात कोणतेही जलस्नेत नसल्यामुळे गावक:यांना पिण्याच्या पाण्यासाठी रानावनात भटकंती करावी लागत आहे. यास वैतागून 14 रोजी सकाळी 6 वाजता अचानक गावातील हजारोंचा जमाव सरपंच अख्तर हुसेन कहाकर यांच्या घरी व नंतर ग्रामपंचायतीवर धडकला. या वेळेस संतप्त ग्रामस्थांची प्रचंड गर्दी जमा होऊन तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. घराजवळ मोठय़ा संख्येने लोक जमल्याने सरपंच काही वेळातच ग्रामपंचायत कार्यालयात आले, त्यामुळे जमाव त्यांच्या पाठोपाठ आला. सरपंचाशिवाय ग्रामपंचायतीत कोणीच नसल्याने त्यांच्या अंगावर काही लोक धावून गेल्याचा प्रकार घडल्याने प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काही वेळेतच ग्रामसेवक पी.ए. चव्हाण हे आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, निर्माण झालेली ही परिस्थिती लक्षात घेता ग्रा.पं. पाणी पुरवण्यास अपयशी ठरत आहे, ही बाब मान्य करीत सरपंच व ग्रा.पं. सदस्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. ग्रामस्थांना पिण्यास पाणी न मिळाल्यास ग्रा.पं.वर मोर्चा काढण्यात येण्याची शक्यता असल्याचे इशारावजा वृत्त पंधरा दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तथापि ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली नाही. दरम्यान, या परिसरातील धरणे कोरडीेठाक पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याकरिता गावाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्यासाठी बहुळा धरणच पर्याय आहे, असे सरपंचांनी सांगितले. दरम्यान, धरणातील पाणीपुरवठा करणा:या विहिरी खोलीकरणाचे काम लवकरच हाती घेत असल्याचे सांगून ग्रामस्थांची समजूत घालण्यात आली. (वार्ताहर)
कु:हाड येथील पाणीप्रश्न पेटला
By admin | Published: April 15, 2017 12:35 AM