सौरभ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कममुराबाद, ता. जळगाव :कशी काळाची चाहुल आली ।बाग सुखाची करपून गेली ।।कसं विपरीत झालं सारं।होता सोन्याचा संसार...।।रक्ताचे पाणी करून शेतात उभा केलेला खरीप हंगाम डोळ्यादेखत वाया गेल्यानंतर परिसरातील प्रत्येक शेतकऱ्याची अवस्था आज वरील गाण्याच्या पक्तींप्रमाणे झाली आहे. सततच्या पावसामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने डोळ्यासमोर अंधार पसरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भरीव मदत देण्याची मागणी त्यामुळे आता होत आहे.ममुराबाद भागातील शेतकरी खरिपात प्रामुख्याने कापसाचे पीक घेतात. त्यातही पूर्वहंगामी उन्हाळी कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. चांगल्या उत्पादनाच्या आशेने ४४ अंश सेल्सिअस तापमान तसेच भारनियमनावर मात करीत कपाशीचे पीक जगविण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाºया शेतकºयांसाठी कापूस म्हणजे पांढरे सोनेच. कापसाचे पीक हाती आल्यानंतरच खºया अथार्ने शेतकºयाच्या घरात दसरा- दिवाळी साजरी होते. डोक्यावरील कजार्चा भार थोडासा का होईना पण हलका झाल्याने चिंता मिटते. दुदैर्वाने यंदा दिवाळीच्या सणाला कोणत्याच शेतकºयाचा घरात पांढºया सोन्याने आगमन झाले नाही. सततच्या पावसामुळे पांढरे सोने घरात येण्यापूर्वीच काळवंडले. वेचणी बाकी राहिलेल्या कापसातील सरकीला झाडावरच कोंब फुटले. बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याने नवीन बहर सुद्धा सडल्याने गळून पडला.फुलपात्यांची गळ सुरुआता पाऊस थांबलेला असला तरी नवीन फुलपात्यांची गळ मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे आगामी काळात कपाशीपासून फार काही उत्पन्न मिळण्याची आशा मावळली आहे. कापसापासून निराशा झाल्यानंतर डोक्यावरील कर्ज फेडावे तरी कसे, या विवंचनेत शेतकरी येणारा दिवस ढकलत आहे. दरम्यान, लाल्याची विकृती वाढल्यामुळे हिरवीगार कपाशी रात्रीतून पिवळी पडण्याचे प्रकार आता सुरू झाले आहेत.दिवाळीच्या मोसमावर एकरी किमान पाच ते सात क्विंटलपर्यंत कापूस उत्पादन घेणाºया शेतकºयांच्या घरात यंदा पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याने एकरी अर्धा क्विंटलचेही उत्पादन आलेले नाही. त्याचा विचार करून प्रतिहेक्टरी आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी त्यामुळे होत आहे.रब्बी हंगाम लांबणीवरसततच्या पावसामुळे खरिपाची काढणी लांबणीवर पडल्याने रब्बीच्या पेरण्यांनाही यंदा मोठा विलंब झाला आहे. जमिनीचा वापसा संपल्याने पेरणीपूर्व मशागतीसह अनेक कामे रखडली आहेत. रब्बीच्या पेरण्यांना आणखी उशीर झाल्यास दादर ज्वारीसह हरभरा पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कडब्याचे नुकसानजनावरांसाठी कोरड्या वैरणीची व्यवस्था करण्यासाठी अनेक शेतकरी खरिपात संकरीत ज्वारीची पेरणी करीत असतात. यंदा सतत पाऊस सुरू असल्याच्या स्थितीत ज्वारीचे पीक वाया गेल्याने वैरणीसाठी उपलब्ध होणारा कडबा काळा पडला आहे. सोयाबीनच्या काढणीनंतर मिळणारे कुटार पण वाया गेले आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा आणावा कुठून, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.
कसं विपरित झालं सारं, होता सोन्याचा संसार...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 9:59 PM