शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

उन्मेश पाटलांना भाजपने काय कमी दिले? अजित चव्हाण यांचा सवाल 

By सुनील पाटील | Published: April 04, 2024 2:40 PM

मतदारच त्यांना जागा दाखवतील असे आव्हान भाजपचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांना केला.

जळगाव : उन्मेश पाटील यांना भाजपने आमदार केले, खासदार केले. रस्त्यावरुन उचलून नाव दिले. इतकेच काय मागील निवडणुकीत स्मिता वाघ यांचे तिकिट कापून उमेदवारी दिली. वाघ सिनिअर आहेत, त्यांचे तिकिट का कापले असे तेव्हा का नाही म्हटले. उन्मेश पाटील यांच्याकडे उत्तर नाही. मतदारच त्यांना जागा दाखवतील असे आव्हान भाजपचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांना केला.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त बुथ विजय अभियान राबविले जाणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, दीपक सूर्यवंशी व विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते. उन्मेश पाटील यांच्यावर टीका करताना चव्हाण म्हणाले, मी स्वत: चाळीसगाव तालुक्यातील रहिवाशी आहे. एकेकाळी ते बसस्टॅडवर झाडू मारण्याचे काम करीत होते. त्यांना गिरीश महाजन यांनी आमदार, खासदार केले. नाव दिले, ताकद दिली. आज उमेदवारी नाकारताच महाजनांवर टीका करायला लागले. खरे तर त्यांनी संयम ठेवायला हवा होता. संयम ठेवणाऱ्यांना नक्कीच मोठी संधी मिळाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे आज पक्षाचे राज्याचे प्रमुख आहेत. स्मिता वाघ यांचे तिकीट कापून त्यांना उमेदवारी दिलीच होती, मग तेव्हा का नाही बोलले. ते जेथे केले, तेथे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.

प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविणारभाजप स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिलपासून बुथ विजय अभियान राबविले जाणार आहे. यात पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जातील. पत्रके वाटप करण्यासह वाहनांना स्टीकर लावतील. मागील निवडणुकीत ज्या बुथवर जितके मतदान झाले होते, तेथे ३७० मतदान जास्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. अभियानात महिला, युवा यांच्या बु‌थनिहाय पाच समूह बैठका घेतल्या जाणार आहेत. दोन्ही मतदारसंघात उमेदवार पाच लाखापेक्षा जास्त मताधिक्यांनी विजयी होतील असा दावा अजित चव्हाण यांनी केला. 

टॅग्स :Jalgaonजळगावmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४