जळगाव : युती होईल की नाही हे आता सांगता येणार नाही, आमच्या सर्व ७५ उमेदवारांची यादी आम्ही तयार केली आहे. तसेच बुधवारपर्यंत सर्व उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. आता जे होईल ते मैदानात होणार असल्याची माहिती माजी महापौर रमेशदादा जैन यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.शिवसेनेच्या चिन्हावर लढणाररमेशदादा म्हणाले की, सर्व ७५ जागांवर शिवसेनेकडून उमेदवार दिले जाणार असून चांगले उमेदवार देण्यावर भर दिला जाणार आहे. शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय सुरेशदादांनी घेतला होता. त्या निर्णयाचा मान ठेवून आम्ही सर्व मावळ्यांनी निवडणुकीसाठी तयारी केली आहे.जनतेचा दादांवरचा विश्वास कायमसुरेशदादा जैन यांनी निर्मळ मनाने व जळगावच्या विकासाच्या दृष्टीने युतीबाबतचा प्रस्ताव दिला होता. मात्र, ज्या पध्दतीने आतापर्यंतच्या घडामोडी झाल्या आहेत त्या सर्व घडामोंडीबाबत जनतेत नाराजी आहे. सध्या जे घडक आहे ते आमच्या नियमात नसून, जळगावकरांनी आतापर्यंत सुरेशदादांवर जो विश्वास दाखविला आहे. तोच विश्वास पुढे देखील कायम राहणार असल्याचा विश्वास रमेशदादा जैन यांनी व्यक्त केला.शिवसेनेकडून मंगळवारी १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, बुधवारी उर्वरीत सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल होणार आहेत. यासाठी पक्षाकडून सर्व उमेदवारांना सकाळीच एबी फॉर्म दिले जाणार आहेत. याबाबत रात्री उशीरापर्यंत सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु होती. यामद्ये उमेदवार निश्चितीबाबत चर्चा झाली.कोल्हेंच्या पक्षांतरामुळे काही फरक नाहीमहापौर ललित कोल्हे यांनी भाजपात प्रवेश केल्याबाबत पत्रकारांनी रमेशदादा जैन यांना विचारले असता. त्यांनी सांगितले की, ललित कोल्हे यांच्या पक्षांतरामुळे शिवसेनेवर कोणताही परिणाम झाला नाही. उमेदवारांच्या यादीमधून त्यांच्या नावावर काट मारून, त्या जागी दुसºया उमेदवाराचे नाव टाकणे इतकाच माझा वेळ गेल्याचे सांगत कोल्हेंना टोला लगावला.आपण कुठे जात आहोत याचाच विचार विरोधकांनी करावाउमेदवार पळवा-पळवी बाबत बोलताना रमेशदादा म्हणाले की, सर्व घडोमोंडीवर सर्व जळगावकर लक्ष ठेवून आहेत. ज्या पध्दतीने उमेदवारांची पळवा-पळवी सुरु आहे. यावरुन आपण कुठे जात आहोत याचा विचार विरोधकांनी करावा असेही रमेशदादा म्हणाले. युती होईल की नाही ? याबाबतचा निर्णय सुरेशदादाच घेणार आहेत. मात्र, मी माझ्या पक्षाच्या ७५ उमेदवारांची सुरेशदादांकडे सोपविणार असून, अखेरचा निर्णय सुरेशदादाच घेणार असल्याचेही रमेशदादा म्हणाले.
आता जे होईल ते मैदानातच - रमेशदादा जैन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:15 PM
सर्व ७५ उमेदवारांची यादी तयार
ठळक मुद्देशिवसेनेच्या चिन्हावर लढणारजनतेचा दादांवरचा विश्वास कायम