- डमी
- स्टार - ७७९
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना विषाणूने कहर माजविल्यानंतर दहावीनंतर आता बारावीची परीक्षा सुध्दा रद्द झाली आहे. परीक्षा रद्द झाल्याने आता मूल्यमापन कोणत्या पध्दतीने होणार? वैद्यकीय, अभियांत्रिकीसह पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश कसे होणार, असा सवाल बारावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन पर्यायांचा विचार करत होते. मे महिना संपत आला तरी परीक्षा घेण्याबाबत शासनाकडून पर्याय निश्चित होत नसल्याने बारावीचे विद्यार्थी संभ्रमात होते. त्यामुळे शासराने परीक्षेसंदर्भात तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. तेवढ्यात सीबीएसई बारावी परीक्षा रद्दचा निर्णय घेण्यात आला. अखेर राज्य शासनाने सुध्दा बैठक घेवून बारावीची परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता मूल्यमापन कसे होणार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर गेली तरी ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती आता रद्द झाली आहे. आता प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाईल, हा संभ्रम अजून आहे. त्यामुळे तात्काळ निर्णय व्हावा.
- संदीप पवार, विद्यार्थी
---------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला तो योग्य वाटतो. आमच्या मूल्यमापनाचे सूत्र लवकरात लवकर जाहीर करून पुढील प्रक्रियाचे नियोजन स्पष्ट करावे.
- निलीमा सैंदाणे, विद्यार्थिनी
======
ऑनलाइन परीक्षा घेत आली असती. पण, आता शासनाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला आहे. परीक्षा रद्द झाल्याने वर्षभर अभ्यास करणा-या हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांवर एकप्रकारे अन्याय होणार आहे. त्यामुळे योग्य पध्दतीने मूल्यमापन केले जावे.
- पंकज सोनार, पालक
---------
विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने बारावीची परीक्षा ही अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे ऑनलाईन का असेना परीक्षा घ्यायला हवी होती. पण, आता परीक्षा रद्द केली असल्यामुळे मूल्यमापन योग्य पध्दतीने करावे व पुढील प्रक्रिया कशी राबविणार हे सुध्दा स्पष्ट करावे.
- कमलेश पाटील, पालक
======
निकाल व पुढील प्रक्रिये संदर्भात अद्याप शासनाचे कुठलेही पत्र प्राप्त झालेले नाही. परीक्षा रद्दबाबत सुध्दा अधिकृत पत्र महाविद्यालयाला प्राप्त झालेले नाही. शासनाच्या सूचना आल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाईल.
- राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय
--------
शासनाने बारावीची परीक्षा रद्द केली आहे. शासनाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठस्तरावरून प्रवेश प्रक्रियाबाबत पुढील नियोजन केले जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयाकडून ऑनलाइन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. अजूनही शासनाचे धोरण स्पष्ट नाही. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे.
- एल.पी.देशमुख, प्राचार्य, नुतन मराठा महाविद्यालय
========
बारावीचे एकूण विद्यार्थी
- ४९ हजार ४०३
- विज्ञान
२० हजार १९४
- कला
२० हजार ४९१
- वाणिज्य
६ हजार २९५
- एमसीव्हीसी
२ हजार ४२३