ऐनवेळी स्वपक्षाने निवडणुकीचे तिकीट नाकारलेल्या तिय्यम श्रेणीतील कार्यकत्र्याप्रमाणे संतापाचे फुत्कार टाकत नाना माङया घरात शिरला. पण त्याचा अवतार मात्र ‘काटे की टक्कर’ देऊन निवडून आलेल्या विजयी उमेदवारासारखा रंगीत-संगीत होता. कपडे गुलालाने माखलेल्या. गळ्यात भाराभर हार, केसांवर ङोंडूच्या फुलांच्या पाकळ्या अडकलेल्या. मला बघताच तार सप्तकात तो चित्कारला. ‘तू मिरवणुकीला का नाहीस आलास?’ ‘मिरवणूक? कोणाची मिरवणूक?’ माङयाकडे बघून लक्षात येत नाहीये? कसा दिसतोय मी? ‘तू ना, कापण्यासाठी, देवीला नेल्या जाणा:या नवसाच्या बोकडासारखा दिसतोयस.’ गळ्यात ङोंडूच्या फुलांच्या माळा, अंगावर गुलाल.‘मुर्खासारखा बोलू नकोस.’ गावक:यांनी माझी शोभायात्रा काढली होती. वेशीवर पोहोचताच त्यांनी मला बसमधून उरतवून घेतलं आणि सजवलेल्या बैलगाडीतून मिरवत गावात आणलं. काहींनी जुनी पादत्राणं गोळा करायला सुरुवात केली होती. तेव्हाच मला अंदाज आला होता की, गावकरी एक दिवस तुझी ‘शोभायात्रा’ काढणार. पण या ङोंडूच्या फुलांच्या माळा, हा अंगभर गुलाल.. पचायला जरा जड जातंय. ‘मत्सरी मित्रा, अरे मी नृत्य, गाण्याची ऑडीशन देऊन आलोय.’ ‘आत्ताशी ऑडीशन दिली आहेस ना, दिल्ली तो अभी दूर है. आणि लगेच बैलगाडीतून अवघड मिरवणूक?’ ‘मॅनेज करना पडता है यार. सब मॅनेज करना पडता है. तू बघत रहा, मी काय काय मॅनेज करतो ते. आपल्या गावातल्या दोन-तीन फाकडय़ा पोरींनासुद्धा माङयासोबत नाचायला तयार केलंय मी. गावात मस्त हवा तयार झालीय. व्होट्स के एसेमेस तो आने चाहीये ना बाबा.’ मी म्हटलं, ‘नाना, तरीच बरं का. मला आत्ता खुलासा होतोय. तुङया नृत्याच्या रिअॅरिटी शोजचा काय सांगावा करीश्मा. शेजारच्या कंजूष म्हाता:यानेही नवा करून घेतलाय चष्मा. नाना म्हणाला, अरे म्हाता:याचं सोड, आख्ख्या पब्लीकचे डोळे फाटले पाहिजे. रिअॅलिटी शो जिंकायचे म्हणजे हे सर्व करावंच लागतं. रिअॅलिटी शोचं सोड. पण एरव्हीही मला प्रश्न पडतो. टीव्हीवर नाचणा:या पोरींचे मला तर काय कळतच नाय? दिवसा घालतात स्त्रीचे कपडे, मग ह्या रात्री घालतात काय? नाना म्हणाला, ‘तुला वाटतं तसं नसतं. त्या चांगल्या सुसंस्कृत श्रीमंत घरातल्या धीट मुली असतात.’ तरीही मला प्रश्न पडलाय की- टीव्हीमधल्या ‘धीट’ पोरी नाचताय रिमिक्स गाणी, पोरी आहेत धीट, मग त्यांचे कपडे फाडलेयत कोणी? नाना वडीलधा:या व्यक्तीचा आव आणत मला समजावत म्हणाला, ‘अरे बाबा, ते त्याच्या ड्रेस डिझायनरने फाडलेले.. आय मीन मापलेले असतात. रिमिक्स गाण्यावर नाचायचे म्हणजे पोषाख, संगीत सगळंच रिमिक्स करावं लागतं. मी हताशपणे म्हणालो, ‘नाना, मला आशा आहे की, एक तरी परीक्षक माङयासारख्याच्या मनातली तळमळ तुमच्यार्पयत पोहोचवेल. मला म्हणायचं आहे की, ‘रिमिक्स गाणी गाणा:यांना कोणीच कसं सांगत नाही,जवाहि:यांच्या दुकानातून लोखंड, भंगार विकत नाही.’ यावर नाना निर्लज्जपणे म्हणाला, ‘रिमिक्स काय असते तुला काय माहीत? गरिबी भोगलेल्या कोणालाही विचार, रिमिक्स म्हणजे काय रे भाऊ? तो सांगेल, आई नाही का करत शिळ्या पदार्थातून नवा खाऊ.
रिमिक्स म्हणजे काय असतं रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 1:28 AM