जळगाव : ‘अजित पवार यांचे आव्हान स्विकारत आपण बारामतीतही जायला तयार आहोत’ या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या वक्तव्याचा समाचार आमदार डॉ. सतीश पाटील यांंनी पक्षातर्र्फे आयोजित मोर्चास संबोधित करताना घेतला. बारामतीला काय जाता... इथेच तुम्हाला दाखवून देऊ, असा पलटवार त्यांनी महाजनांवर केला. यासाठी संजय गरुड यांना त्यांनी प्रोत्साहीत केले.राष्ट्रवादी काँग्रेतर्फे बरोजगारी तसेच विविध प्रश्नांवर भाजपा सरकार व पंतप्रधान मोदी यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी १३ रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी डॉ. पाटील बोलत होते. मोर्चात माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, अनील भाईदास पाटील, डॉ. सुभाष देशमुख, संजय गरुड, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुुल, महानगर अध्यक्ष नामदेवराव चौधरी, महिला महानगर अध्यक्ष निला चौधरी, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, सविता बोरसे, युवक महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष संभाजी धनगर, रोहन सोनवणे, संतोष जाधव, दिलीप सिखवाल, करण खलाटे, सलीम इनामदार, मनोज पाटील,संदीप पाटील, अरविंद मानकरी,उज्ज्वल पाटील, संजय चव्हाण, चंद्रकांत चौधरी, गणेश निंबाळकर, मधुकर म्हसके, सुदाम पाटील, डॉ. रिजवान , रहीम तडवी, दुर्गेश पाटील आदींची उपस्थिती होती.राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाजवळून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यावर त्याचे सभेत रुपांतर झाले असता नेत्यांची यावेळी भाषणे झालीत.समोरच्यांच्या नाकेनऊ येतीलभाजपाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या एका वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाजन यांना बारामतीत येवून निवडणूक जिंकून दाखवा असे आव्हान दिले होते.हे आव्हान स्विकारत आपण बारामतीतही जायला (पालिका निवडणुकीसाठी) तयार आहोत, असे प्रतिआव्हान महाजन यांनी दिले होते.यावर डॉ. सतीश पाटील यांनी वरील विधान करताना महाजन यांचे गेल्यावेळीचे प्रतिस्पर्धी संजय गरुड यांना सांगितले की, थोड्या पराभवाने (शेंदुर्णी नगरपंचायत) न खचता मरगळ झटका आणि विधानसभेत त्यांना (गिरीश महाजन) यांना दाखवून द्या. असे कामाला लागी समोरच्यांना नाकेनऊ येतील.खासदार ए.टी. पाटील यांचा समाचार घेताना ते म्हणाले, प्लास्टिक पार्क तर उभारला नाही पण त्यांचेही आता काही खरे नाही.गादीवरचे पहेलवान सर्वांना माहीतजिल्ह्यात सध्या दोन नेत्यांमध्ये कुस्त्या सुरु आहेत. एक पहेलवान म्हणतो मी मातीतला पहेलवान आहे. तर दुसरा पहेलवान हा गादीवरील कुस्त्या खेळणारा पहेलवान आहे. हा पहिलवान कसा आहे, हे सर्वच जण जाणतात, असा टोलाही आमदार पाटील यांनी अनुक्रमे गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांना लगावत भाजपात संस्कृती नाही अशी टिकाही केली. तसेच गिरीश महाजन हे विविध प्रकल्प जिल्ह्यात आणणार होते मात्र काहीच आले नाही, यावरही टिका केली.खडसेंनी स्वत:ची चिंता करावीलोकसभेसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही, हे एकनाथराव खडसे यांचे विधान चुकीचे असून त्यांनीआमची चिंता न करता स्वत:ची चिंता करावी. आमच्याकडे १ नाही तर १० उमेदवार आहेत, असे विधान करीत डॉ.पाटील हे गुलाबराव देवकर यांच्याकडे पाहून म्हणाले की, अप्पा तुम्ही हिम्मत दाखवा.. सगळ्यांना भारी पडाल. यावर देवकर यांनी अनिल भाईदास पाटील यांच्याकडे बोट दाखवले. तेव्हा डॉ.पाटील म्हणाले की, ते तर आहेच पण तुम्हीच तयार व्हा. दरम्यान सगळ्यांनी कामाल लागण्याची गरज असून कोण काय करते याची माहिती अजित पवार यांना रोजच मिळत आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.निवासी जिल्हाधिकाऱ्यांना केले मतदानाचे आवाहनजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायला जात असताना गदी पाहून पोलिसांनी मोर्चेकºयांंना अडविण्याचा प्रयत्न केला. याबाबत डॉ. सतीश पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत अघोषित आणिबाणीची ही स्थिती असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांना सांगितले. तसेच मोदी यांनी कोणतीही आश्वासने पाळली नसून देशापुढे महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आदी विविध प्रश्न वाढले आहेत. याबाबत आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून काही बोलू शकत नाही मात्र मतदान करताना आम्हालाच करा, असे आवाहनही मुंडके यांना आमदार पाटील यांनी केले असता हशा पिकला. दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी हे उपस्थित नसल्याबद्दलही मोर्चेकºयांनी नाराजी व्यक्त केली.निषेध म्हणून काढले रस्त्यार भजेनरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २ कोटी नोकºया देण्याचे आश्वासन दिले होते मात्र नोकºया तर दिल्याच नाही पण दीड कोटी नोकºया लोकांना गमावाव्यालागल्याचा शासकीय अहवाल आहे. अशा स्थितीत पंतप्रधान मोदी म्हणातत, तरुणांनी वडे- भजे विकावे. या विधानाचा निषेध म्हणून रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातगाडीवर भजे तळण्यात आले.
'बारामतीला काय जाता... इथेच दाखवून देऊ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:15 AM
डॉ.सतीश पाटील यांचा इशारा
ठळक मुद्दे राष्ट्रवादीच्या मोर्चात गिरीश महाजनांवर पलटवार