वाघडू, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : येथील पातोडे शिवारातील शेतकरी शंकर बारकू पाटील यांच्या शेतातील दोन एकरांतील ऊस जळून खाक झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सातला घडली. विद्युत लाईनच्या तारेच्या शॉटसर्किटमुळे हा प्रकार घडला.वाघडू येथील शेतकरी शंकर पाटील यांनी आपल्या शेतात शेतात पाच एकर उसाची लागवड केली आहे. त्यांनी कमी पाण्यावर उसाचे पीक जोपासले. तोडणीला आलेला ऊस शार्टसर्किटमुळे जळाला आहे. याबाबत अनेक वेळा महावितरणकडे तक्रार केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे पाटील यांनी सांगितले.दरम्यान, उसाचे जवळपास एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यातआले. या घटनेचा पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी शंकर पाटील यांनी केली आहे. यापूवीर्ही अशाही घटना घटल्या आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील पातोंडे शिवारात उसाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 3:55 PM
पातोडे शिवारातील शेतकरी शंकर बारकू पाटील यांच्या शेतातील दोन एकरांतील ऊस जळून खाक झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सातला घडली.
ठळक मुद्देदोन एकरातील ऊस जळून खाकदीड लाखांचे नुकसानशॉर्टसर्किटमुळे उसाला लागली आगपंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी