शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

ठेवीदारांसाठी जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 9:08 PM

आश्वासनाचा विसर

ठळक मुद्दे ठेवीदारांचे कोट्यवधी रूपये अडकूनही प्रशासनाचे दुर्लक्ष ‘संकल्प ते सिद्धी’ कागदावरच

जळगाव : ‘संकल्प ते सिद्धी’ उपक्रमांतर्गत २०१८ या वर्षात करावयाच्या कामांमध्ये ठेवीदारांच्या प्रश्नाबाबत फेब्रुवारी २०१८ पासून धडक मोहीम राबविण्याचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जाहीर केले होते. मात्र घोषणा होऊन चार महिने तर मोहीम सुरू करण्याचा कालावधी उलटून ३ महिने झाले तरीही ही मोहीम अद्यापही सुरू झालेली नाही.सहकार विभाग नाचवतेय कागदी घोडेसहकार विभागाच्या निष्क्रिीयतेमुळे जिल्ह्यातील पतसंस्थांमधील ठेवीदारांचा ठेवींचा प्रश्न प्रलंबित आहे. सहकार राज्यमंत्री जिल्ह्यातील असताना व त्यांच्या तसेच सहकार आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक होऊन व त्यात २१ कलमी कार्यक्रम निश्चित होऊनही त्यानुसार अंमलबजावणी मागील वर्षभरात झालीच नाही. या कार्यक्रमात निश्चित करून दिलेल्या कालावधीत संबंधीत कामे झालेली नाहीत. प्रत्यक्षात अनेक ठेवीदारांना पैशांची तातडीने गरज आहे. सहकार विभाग मात्र केवळ कागदी घोडे नाचविताना दिसत आहे.मालमत्ता खरेदीचा अवघड उपायआता शासनाच्या नवीन निर्णयानुसार ठेवीदारांना पतसंस्थांच्या मालमत्ता खरेदीसाठी आवाहन केले जात आहे. त्यासाठी मालमत्तांचे मूल्यांकन होऊन त्यांना जिल्हा उपनिबंधकांची मंजुरी घेण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यात ८५ टक्के ठेवीची रक्कम तर १५ टक्के रक्कम ठेवीदाराने घरून टाकायची आहे. मात्र बहुतांश ठेवीदारांना मुलींच्या लग्नासाठी पैसा नाही, अशी परिस्थिती आहे. ते मालमत्ता घेण्यासाठी आणखी १५ टक्के रक्कम कुठून आणणार? तसेच मालमत्ता घेऊन ती कोणाला विकणार? असा प्रश्न आहे. कारण जर त्या मालमत्तांना महत्व असते तर सहकार विभागाने काढलेल्या लिलावातच त्याची विक्री होऊन पैसे वसुल झाले असते. त्यामुळे या भानगडीत किती ठेवीदार पडतील? असा प्रश्न आहे. कारण बहुतांश ठेवीदार हे सेवानिवृत्त आहेत. तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तर अनेक ठेवीदार सामान्य घरातील आहेत. त्यांना पैसे भरले तसे ते परत मिळावेत, एवढीच भाबडी आशा आहे. मात्र सहकार विभाग संचालकांच्या तसेच बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती व लिलाव करण्याची धडक मोहीम राबवायला धजावत नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: आश्वासन दिल्यावर तरी या विषयात लक्ष घालणे अपेक्षित होते. मात्र चार महिन्यात ते झालेले नसल्याचे दिसून येत आहे.तक्रारींचीही दखल नाहीजिल्हास्तरीय लोकशाही दिनी तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने दीड वर्षातील तब्बल १३०७ तक्रारी अद्यापही प्रलंबित आहेत. या तक्रारींपैकी ६०९ तक्रारी या सहकार विभागाशी संबंधीत म्हणजेच पतपेढ्यांमधील ठेवींबाबत आहेत. त्यांचा जिल्हा उपनिबंधकांनी स्वतंत्रपणे आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांना लोकशाही दिनातील तक्रारींचा वेळेवर निपटारा करण्याबाबत ताकीद देण्यात आली. मात्र अद्यापही सहकार विभागाच्या स्वतंत्र लोकशाही दिनाची तारीख व वेळ जाहीर झालेली नाही.------काय आहे ‘संकल्प ते सिद्धी’?राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय जळगाव आयोजित ‘सिद्धी २०१७ व संकल्प २०१८’ या उपक्रमांतर्गत पत्रकार दिनाचे औचित्य साधून ५ जानेवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी येत्या वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती दिली होती.