जळगाव- पारोळा शहरातील काझी वाडा भागाजवळ घराचे छत कोसळून त्याखाली दबले गेल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (6 ऑक्टोबर )पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गाढ झोपेत असताना काझी कुटुंबीयावर काळानं घाला घातला आहे. दरम्यान, या घटनेत एक जण बचावला आहे. मृतांमध्ये आई, दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे.
सायराबी भिकन काझी (वय ५० वर्ष), हसीन काझी (वय २५ वर्ष), मोईन काझी ( वय १९ वर्ष) आणि शबीना काझी (वय १७ वर्ष ) अशी मृतांची नावे आहेत. यात वसिम काझी या घटनेतून बचावला आहे. काझी कुटुंबीय साखर झोपेत असताना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज होऊन घराचे छत कोसळले आणि यात चार जणांचा दबून मृत्यू झाला.
चारही मृतदेह पारोळा कुटीर रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती पारोळा येथील पोलीस निरीक्षक एकनाथ पडाळे यांनी दिली. मृतांमधील हसीन यानं बीईचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो नोकरीच्या शोधात होता. दरम्यान, या मुलांचे वडील भिकन काझी हे चादर विक्रीचा व्यवसाय करतात. यासाठी ते अक्कलकुवा (नंदुरबार) येथे गेले आहेत.
मृत पावलेल्या सायराबी काझी
मोईन काझी