जळगाव : जळगाव जिल्हा क्रीडा संकूल समितीने सध्या क्रीडा संकुलातील समस्यांकडे फारसे लक्ष दिलेले नाही. क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टची दुरवस्था झाली आहे. पार्किंगमधील पेव्हर ब्लॉक खराब झाले असले तरी ते बदलण्यासाठी अजूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही.बॅडमिंटन कोर्टमध्ये काही ठिकाणी फळ््या वर आलेल्या आहेत. तर काही ठिकाणी खिळे वर आले आहेत. त्या जागांवर बॅडमिंटन खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी लाकडी फळ््या हलतात. त्यात खेळाडूचा पाय अडकून जायबंदी होऊ शकतो. जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टचा उपयोग बहुउद्देशीय सभागृहाप्रमाणे केला जातो.त्यामुळे या ठिकाणी बॅडमिंटन कोर्टवर योग्य प्रमाणे गमिंग केले जात नाही. त्याच ठिकाणी तायक्वांदो, बॉक्सिंग यांचे सामनेही घेतले जातात. कोर्टच्या लाकडी फळ््यांवर अतिरिक्त वजन सातत्याने येत असल्याने त्या तुटु लागल्या आहेत. या फळ््या बदलण्याची आणि कोर्टच्या दुरुस्तीच मागणी शहरातील बॅडमिंटन खेळाडू आणि क्रीडा प्रेमींकडून सातत्याने केली जात आहे. पेव्हर ब्लॉकची समस्या ही कायमचीच आहे. स्टेडिअमच्या कोपऱ्यावर सुंदरसा कट्टा बनवणाºया संकूल समितीने या कडेही दुर्लक्षच केले. शौचायलयांची समस्या ही मोठी आहे. चार विंगच्या व्यापारी संकुलात फक्त दोनच शौचालये सुरू आहेत. त्यातही अस्वच्छता आणि गळती आहे. याबाबत नेहमीच नाराजी व्यक्त केली जाते. बॅडमिंटन कोर्टच्यावर असलेल्या शौचालयाचीही दुरवस्था झाली आहे. या शौचालयाचा दरवाजा तुटलेला आहे. तसेच अस्वच्छता असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ही वस्तुस्थिती नाकारून जिल्हा क्रीडा संकूल समिती फारसे लक्ष देत नाही.
क्रीडा संकुलाच्या समस्यांकडे लक्ष जाणार कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 1:11 PM