जळगाव: भाजपाने मनपा आणि पालिका निवडणुकांमध्ये कसा विजय मिळवला हे सर्वांनाच माहीत आहे. एकीकडे भ्रष्टचार करीत नाही, असा दावा भाजपावाले करीत असताना त्यांनी या निवडणुकांमध्ये एवढा पैसा कोठून आणला कोठून? असा सवाल राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी येथे करीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक शुक्रवारी दुपारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झाली. जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार यांच्याकडून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची ही बैठक बोलविण्यात आली होती.ईश्वरलाल जैन म्हणाले की, जळगाव, नाशिक, धुळे या मनपा तसेच जामनेर, शेंदुर्णी या पालिकांमध्ये भाजपाला यश हे पैशांच्या बळावर मिळाले. हा पैसा जर भ्रष्टाचाराच्या मार्गातूून आला नसेल तर मग यांनी यांच्या घरुन पैसे खर्च केले का? हे एवढे श्रीमंत होते का?याचाही पंचनामा होणे गरजेचे आहे. दरम्यान यावेळी जैन यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख केला नसला तरी महाजन यांनीच भाजपाकडून या निवडणुकांचे नेतृत्व केले होते. त्यामुळे नाव न घेता हा निशाना साधला गेला.मोदी यांच्यावर टीकाराफेल घोटाळ्याचा आरोप अगदी सत्य असून काही राज्यात सत्तांतरानंतर भाजपाचे घोटाळे बाहेर येवू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतही भाजपाला यश मिळाणार नाही, मी जे भाकीत करीत आहे त्यामुळे अजूनही त्यांची सत्ता असल्याने मला त्रास होवू शकतो. परंतु मी स्वच्छ असल्याने मला कुणाची भिती नाही, असे म्हणत मोदी यांच्यावर जोरदार शब्दात टीका केली. देशाच्या नेतृत्वाची संधी पवार यांना द्यावीदेशाचे नेतृत्व करण्यासाठी भाजपाकडूून जेव्हा नरेंद्र मोदी यांचे नाव आले तेव्हा गुजराथने त्यांना सर्व भेद विसरुन सर्व जागा दिल्या.याचप्रमाणे महाराष्ट्रानेही शरद पवार यांंना संधी द्यावी. पवार यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. यासाठी सर्वांनी जोमाने कामास लागावे असे आवाहनही ईश्वरलाल जैन यांनी केले. आपण निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असला तरी पक्षाचे काम करीतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.रावेर मतदार संघासाठी रवींद्र पाटील ?जळगाव लोकसभा मतदार संघासाठी पवार यांनी देवकर यांचे नाव जाहीर केले आहे. मात्र रावेरची माळ ही ज्यांच्या गळ्यात पडणार आहे, (अॅड. रवींद्र पाटील यांच्याकडे पाहून) त्यांनाही आतापासून शुभेच्छा..असा उल्लेखही जैन यांनी केला.सत्ताधाºयांकडे अजून उमेदवार नाहीआमचा उमेदवारजाहीर झाल्यानंतर सत्ताधाºयांकडे अजूनही उमेदवार नाही, अशी खिल्लीही ईश्वरलाल जैन यांनी उडवली.आता मोदी लाट ओसरली आहे. आश्वासने फोल गेली आहेत.आजपासून तालुकानिहाय बैठकीउमेदवार गुलाबराव देवकर यांनी यावेळी सांगितले की, .२३तारखेपासून तालुकानिहाय दौºयात भेटी व बैठकी असे कार्यक्रम असून २३ रोजी चाळीसगाव तालुक्याचा दौरा करणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, नरेंद्र पाटील यांचीही भाषणे झाली.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी केले. यावेळी माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार अरुण पाटील तसेच विलास भाऊलाल पाटील, नामदेवराव चौधरी, सुनिल गरुड, संजय वाघ, ललित बागुल, अभिषेक पाटील, ज्ञानेश्वर महाजन, सोपान पाटील, शशिकांत साळुंखे, प्रमोद पाटील, रवींद्र पाटील, वाल्मिक पाटील, उज्ज्वल पाटील, कल्पना पाटील, मंगला पाटील, सविता बोरसे, निला चौधरी, कल्पिता पाटील, मिनल पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन वाय.एस. महाजन यांनी केले.
मनपा निवडणुकींसाठी पैसा आणला कोठून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 8:26 PM
ईश्वरलाल जैन यांचा सवाल: गिरीश महाजनांवर साधला निशाणा
ठळक मुद्देमोदी यांच्यावर टीका