राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामनेर
तालुकाध्यक्षपदासाठी जामनेरला
निरीक्षकांनी बैठक घेतल्यानंतर
इच्छुकांनी आपल्यालाच नियुक्ती
मिळावी, यासाठी आपल्या समर्थक
नेत्यांकडे फिल्डिंग लावणे सुरु केले
आहे. पदाचे राजकीय महत्व जाणून
असलेले काही इच्छुक उपमुख्यमंत्री
अजित पवार, तर काही प्रदेश
अध्यक्षांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.
आघाडी शासनातील घटक पक्ष
असलेल्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी व
कार्यकर्ते सध्या तालुक्यात सक्रिय
आहेत. संजय गांधी योजनेच्या समितीवर अध्यक्षपदासाठी मोठी चुरस होती. सर्वसामान्य नागरिकांशी थेट संबंध येत असल्याने जनसंपर्काचे महत्त्वाचे साधन म्हणून या पदाकडे पाहिले जाते. राष्ट्रवादीने हे पद आपल्या पदरात पाडून घेतले, तर पंचायत समितीतील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीने केलेले उपोषण
दबाव तंत्राचा भाग ठरले. तालुका
अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आजी, माजी
पदाधिकारी आहेत. वरवार पाहता दिसत
नसली तरी गटबाजी आहेच. त्यामुळे
नियुक्तीतही गटबाजीचे दर्शन होण्याची
शक्यता आहे. असे असले तरी
कार्यकर्त्यांना सांभाळून घेऊन
संघटनेचे काम करणाऱ्याची पदावर
नियुक्ती करण्याकडे जिल्हाध्यक्षांचा
कल असेल, असे बोलले जात आहे.
नजीकच्या काळात होऊ घातलेल्या
सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर
डोळा ठेवून राजकीय घडामोडींना वेग
आला आहे. अशा वेळी पक्षाची बाजू
भक्कमपणे मांडणाऱ्या कार्यकर्त्यास
तालुकाध्यक्ष पद दिले जावे, अशी
अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून
व्यक्त होत आहे.
-मोहन सारस्वत