शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

मोठा कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 1:48 AM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘संस्कार दीप’ या सदरात जळगाव येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा विचारवंत प्रा.प्रभाकर श्रावण चौधरी यांनी बोधकथा लिहिल्या आहेत. त्यातील आज ‘मोठा कोण?’ ही वाचनीय बोधकथा नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

बंगालमध्ये एक महान सत्पुरुष होऊन गेले. तेच थोर संत, स्वामी विवेकानंद यांचे गुरू होते. स्वामी रामकृष्ण परमहंस हे त्यांचे नाव होते. स्वामी रामकृष्णांचा जन्म १८३६ मध्ये झाला. ते १८८६ मध्ये निवर्तले. तेव्हा स्वामी विवेकानंद पंचविशीच्या आत होते. आपल्या गुरूच्या स्मरणार्थ त्यांनी रामकृष्ण मठ ही संस्था स्थापन केली आहे. एकविसाव्या शतकातही तिचे कार्य सुरू आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा शिष्य परिवार फार मोठा होता. त्यांच्याकडे सतत लोक येत असत. आपले प्रश्न, आपल्या समस्या सांगत. त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत. त्यामुळे परमहंस लोकप्रिय होते. ते ज्ञानी होते.एकदा त्यांच्याकडे त्यांचे दोन शिष्य आले. त्या शिष्यांमध्ये मोठा कोण? याबद्दल विवाद झाला होता. एक सन्यासदीक्षेने ज्येष्ठ होता. दुसरा ज्ञानाने मोठा होता. परंतु दोघे स्वत:ला मोठा समजत. एकाने म्हटले, मी मोठा, तर दुसरा म्हणे ‘तर मीही मोठा’! त्यावरून त्यांच्यात भांडणही होई. शेवटी आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी दोघे शिष्य स्वामी समस्येचे निराकरण करण्यासाठी दोघे शिष्य स्वामी परमहंसाकडे आले. दोघांनी आपापले म्हणणे त्यांच्यासमोर सांगितले. त्यासाठी आपापले तर्क दिले. तेव्हा परमहंसांनी मन:पूर्वक स्मित केले.ते प्रसन्न भावमुद्रेने म्हणाले, ‘जो दुसऱ्याला मोठा मानतो, त्याला मोठा म्हणावे. आता तुम्हीच ठरवायचं आहे तुमच्यात मोठा कोण आहे ते!’ दोन्ही शिष्यांनी गुरूंचा निर्णय ऐकला. आता ते परस्परांना मोठा म्हणू लागले. स्वत:कडे लहानपण घेऊ लागले. जो सन्यासदीक्षेने ज्येष्ठ असल्याने स्वत:ला मोठा समजत होता, तो म्हणू लागला. ‘डोक्यावरील केसांचे मुंडण केल्याने काय होते फारसे? म्हत्त्वपूर्ण तर ज्ञानच आहे. तुम्ही माझ्यापेक्षा अधिक शास्त्रांचा अभ्यास केला आहे. तुम्ही प्रभावी प्रवचनकार आहात. तुम्हीच मोठे आहात’. दुसरा म्हणाला, ‘नाही बंधू, शास्त्रे अभ्यासून काय फार मोठे मिळते हो. संन्यासदीक्षा घेऊन साधना करणे महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही साधनेने मोठे आहात. म्हणून तुम्ही श्रेष्ठही आहात.आतापर्यंत ‘मी मोठा’ म्हणून ते झगडत होते. आता ते दुसºयाला मोठा म्हणत होते. मी नाही, तुम्हीच मोठे, अशा जिद्दीवर ते आले. अगोदर कटुता होती. आता गोडवा आहे. अगोदर आग्रह, अहंवृत्ती होती, आता नम्रता व माधुर्य आहे. हे परिवर्तन का घडले. दृष्टी बदलली. घटनांचा संदर्भ बदलला. अर्थ बदलला. त्यामुळे जीवन समपातळीवर आले. मन विशाल बनले. म्हणजे जीवन सुखमय व शांतीमय बनते.- प्रा.प्रभाकर श्रावण चौधरी