जळगाव,दि.28 - यु.एस.ओपन! वर्षातील चार ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या मालिकेतील शेवटची स्पर्धा. 1881 पासून खेळल्या जाणा:या या स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये 1968 मध्ये खुले युग सुरू झाल्यापासूनचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. हा आधुनिक युगाचा सुवर्णमहोत्सव आणि 136 वर्षांच्या इतिहासात युएस ओपनमधील विक्रमांच्या नोंदी अशा :
सर्वाधिक एकुण विजेतेपद (पुरुष) : 16- बिल टिल्डनसर्वाधिक एकुण विजेतेपद (महिला) : 25-मार्गारेट डय़ुपाँटसर्वाधिक एकुण विजेतेपद (पुरुष- खुले युग) : 9- बॉब ब्रायनसर्वाधिक एकुण विजेतेपद (महिला- खुले युग) : 16- मार्टिना नवरातिलोवा
सर्वाधिक एकेरी विजतेपद (पुरूष) : 7- बिल टिल्डन, बिल लार्नेड आणि रिचर्ड सिअर्ससर्वाधिक एकेरी विजतेपद (महिला) : 8- मोला मल्लोरी सर्वाधिक एकेरी विजेतेपद (पुरुष - खुले युग): 5- रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास आणि जिमी कॉनर्ससर्वाधिक एकेरी विजेतेपद (महिला - खुले युग): 6- ख्रिस एव्हर्ट आणि सेरेना विल्यम्स
सर्वाधिक वेळा सहभाग: व्हिक सैक्सास (ज्युनियर)- 28 वर्षेसर्वाधिक वेळा सहभाग (खुले युग): जिमी कॉनर्स -22 वर्षे
सर्वाधिक सामने (पुरूष) - 115- जिमी कॉनर्ससर्वाधिक सामने (महिला)- 113- ख्रिस एव्हर्ट सर्वाधिक सामने विजय(पुरूष) : 98- जिमी कॉनर्ससर्वाधिक सामने विजय (महिला): 101- ख्रिस एव्हर्ट
दोन विजेतपदांतील सर्वाधिक काळ (पुरुष) : 14 वर्षे- केन रोझवालदोन विजेतपदांतील सर्वाधिक काळ (महिला): 15 वर्षे- सेरेना विल्यम्स
सर्वात तरुण विजेता: पीट सॅम्प्रास- 19 वर्षे 28 दिवससर्वात तरूण विजेती: ट्रेसी ऑस्टीन- 16 वर्षे 8 महिने 28 दिवस
सर्वाधिक वयात विजेतेपद (महिला): मोला मल्लोरी- 42 वर्षे 5 महिने 27 दिवससर्वाधिक वयात विजतेपद (पुरुष) : विल्यम लार्नेड- 38 वर्षे 8 महिने 3 दिवससर्वाधिक वयात विजेतेपद (पुरुष-खुले युग): केन रोझवाल- 35 वर्षे 10 महिने 11 दिवससर्वाधिक वयात विजेतेपद (महिला- खुले युग): फ्लेविया पेन्नाटा- 33 वर्षे 6 महिने 18 दिवस