विद्यार्थिनीची छेड
नंदिनीबाई बेंडाळे महाविद्यालयाच्या बाहेर काही रिक्षा चालक थांबतात. येथे रिक्षा थांबा नाही, मात्र महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींची छेड काढण्यासाठीच काही रिक्षा चालक थांबतात. या चौकात पोलिसांनीच काही रिक्षा चालकांना ठोकून पोलीस ठाण्यात नेले आहे. महाविद्यालयात जाताना किंवा येताना मुलींवर लक्ष ठेवून इशारे करणे, गाणे म्हणणे असा प्रकार करतात तर काही रिक्षा चालकांनी मुलींचा घरापर्यंत पाठलाग केल्याची उदाहरणे आहेत.
प्रवाशाला मारहाण करून लुटले
शनी पेठ व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालकांनी प्रवाशांना रिक्षात बसवून मारहाण व लूटमार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. एका परप्रांतीय वृद्धालादेखील रिक्षा चालकांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. आधीच रिक्षात त्यांचे सहकारी बसलेले असतात. सावज शोधून त्यांना आतमध्ये बसविले जाते, नंतर पुढे उतरवून देण्यात येते. जामनेरच्या एका व्यक्तीला अशाच पद्धतीने याच महिन्यात अजिंठा चौकातून बसवून पुढे मारहाण करून लुटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
काय काळजी घेणार?
कोट
शक्यतो परवानाधारकाने रिक्षा चालवावी. भाड्याने द्यायची झाली तर संबंधित व्यक्तीकडे बॅच, बिल्ला असेल तरच द्यावी तसेच त्याची वर्तणूक कशी आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याची पडताळणी झाली पाहिजे. बॅच, बिल्ला असेल तर आमच्याकडे संबंधित व्यक्तीची माहिती असते. रात्रीच्या वेळीच शक्यतो गुन्ह्यांचे प्रकार घडतात. पोलिसांनी त्यांची तपासणी करावी. आरटीओची मदत लागली तर नक्कीच देऊ.
- श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
कोट...
शहरात कोणाचीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. वाहतूक पोलिसांमार्फत अधूनमधून रिक्षांची तपासणी केली जाते. प्रवाशांना लुटणारे तसेच मारहाण करण्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल करून संबंधितांना अटकही करण्यात आलेली आहे. पोलीस दल याबाबत दक्ष आहे. गुंडगिरीचा काही प्रकार घडल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसात तक्रार द्यावी.
- चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक
जिल्ह्यात दाखल गंभीर गुन्हे
२०१९ - २०२० - २०२१ (जुलैपर्यंत)
लूटमार ३७७ - ३६८ - ९९
विनयभंग २८६ - ३१४ - २०१
चोरी ७३३ - ७९२ - २१७
खुनाचा प्रयत्न ९४ - १२७ - ६२
प्रवासी वाहतूक रिक्षा - ३५,५३३
मालवाहतून रिक्षा - १७,४१७