शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

लेवा-मराठा लढतीत सरशी कुणाची? नाराजांना सोबत घेत खडसे व पाटील रणांगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 7:17 AM

रावेर लोकसभा मतदारसंघ हा तसा भाजपचा बालेकिल्ला आहे. सन १९९८ मध्ये काॅंग्रेसकडून डाॅ. उल्हास पाटील हे विजयी झाले होते.

- विलास बारीलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : सलग दोन वेळा विजयी ठरलेल्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना या निवडणुकीत हॅट्ट्रिकची संधी असताना काही दिवसांपूर्वी शरद पवार गटात दाखल झालेल्या श्रीराम पाटील यांनी त्यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघ हा तसा भाजपचा बालेकिल्ला आहे. सन १९९८ मध्ये काॅंग्रेसकडून डाॅ. उल्हास पाटील हे विजयी झाले होते. त्यानंतर आतापर्यंत भाजप सतत विजयी होत आलेला आहे. सलग दोन वेळा खासदार राहिलेले स्व. हरिभाऊ जावळे यांचे २०१४ मध्ये लोकसभेचे तिकिट कापण्यात येऊन  रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर सलग दोन वेळा रक्षा खडसे यांनी मोठा विजय मिळविला; परंतु यावेळी त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळते किंवा नाही याबाबत अनिश्चितता असताना त्यांनी उमेदवारी मिळविली. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून झालेला विरोध शमविण्यात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजप नेत्यांना यश आल्याचे दिसते.

एकनाथ खडसे सक्रिय, रोहिणी खडसे विरोधातरक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी शरद पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत, रक्षा  यांच्या प्रचाराची सुत्रे हाती घेतली आहेत.  त्यांच्या कन्या आणि रक्षा खडसेंच्या नणंद रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मात्र शरद पवार यांच्या सभेत हजेरी लावत श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगरमधून लीड देण्याची जबाबदारी आपली असल्याचे स्पष्ट केले आहे. तिकडे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे सक्रिय नाहीत. इकडे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व माजी आमदार संतोष चाैधरी यांची नाराजी दूर झाली किंवा नाही ते मतपेटीत दिसणार आहे.

लेवा विरुद्ध मराठा लढतीत प्रतिष्ठा पणालाnभाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी देत लेवा पाटीदार व गुजर समाजाला आपल्याकडे वळविण्याचे नियोजन केले आहे.  nशरद पवार गटाकडून  उच्चशिक्षीत व यशस्वी उद्योजक असलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देत मराठा कार्डचा वापर केला आहे. त्यामुळे लेवा पाटीदार विरुद्ध मराठा अशी ही लढत आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

केळी पिक विम्याची प्रलंबित रक्कम तसेच केळी महामंडळाची घोषणा झाली मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या मुद्द्याचे विरोधकांनी भांडवल केले आहे.  सलग दोन वेळा खासदार असलेल्या रक्षा खडसे यांनी देशाची सुरक्षा, मोदी सरकारची विकास कामे, उज्ज्वला योजना, किसान सन्मान निधी, मतदार संघातील रस्ते व रेल्वेविकास या मुद्यांवर प्रचारात भर दिला आहे.

टॅग्स :raver-pcरावेरraksha khadseरक्षा खडसेshriram patilश्रीराम पाटीलMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019