सुशील देवकरज़ळगाव- शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ (नवीन क्रमांक ५३) च्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करण्याच्या कामाची ई-निविदा प्रसिद्ध झाली. त्यामुळे समांतर रस्ते कृती समितीतर्फे पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. समितीने केलेला जल्लोष एकवेळ समजू शकतो, मात्र जिल्हाधिकाºयांनीही ढोलताशांच्या गजरात जल्लोषात सामील होणे थोडे आश्चर्यकारक आहे. एकीकडे या महामार्गावर शेकडो लोकांचे बळी जात असतानाही प्रशासन म्हणून काहीही करू न शकलेल्या जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांचा हा आनंदोत्सव नक्की कशासाठी ? असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.‘नही’तर्फे शहराबाहेरून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुमारे वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले असले तरीही ते अद्यापही व्यवस्थितपणे सुरू होऊ शकलेले नाही, अशी स्थिती आहे. तर शहरातून जाणाºया महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आधीच १०० कोटीचा निधी प्राप्त झालेला होता. त्यामुळे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण अथवा मजबुतीकरण ही प्रक्रिया ‘नही’कडून अशीही करण्यातच येणार होती. मात्र मागणी समांतर रस्त्यांची होती. त्यामुळे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरणाची निविदा निघाल्याने जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाºयांनी रस्त्यावर ढोलताशांच्या गजरात नाचणाºया पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होणे कितपत संयुक्तिक आहे? असा सवाल निर्माण झाला आहे.अभी दिल्ली दूरशहरातील महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या डीपीआरचा घोळ गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. असे असताना सध्या केवळ शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अजून निविदा प्राप्त होणे, त्यांना मंजुरी, त्यांनी काम वेळेवर सुरू करणे, आणि त्यानंतर काम दीड वर्षांच्या कालावधीत पूर्ण करणे आदी अनेक बाबी आहेत. त्यानंतर दुसºया टप्प्याचे काम सुरू होईल. सुरू होईलच? याची खात्रीही देणे अवघड आहे. त्यामुळे केवळ चौपदरीकरणाची निविदा निघाली म्हणून कुणाला विजय मिळाल्याचा आनंद असेल तर तो साजरा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखाने त्यात सहभागी होणे ही बाब खटकणारी आहे. एरव्ही हजारोंचा मोर्चा आला, रास्ता रोको आंदोलन झाले तरीही स्वत:च्या गेटवर देखील निवेदन घेण्यासाठी न येणाºया जिल्हाधिकाºयांनी यापूर्वी समांतर रस्ते कृती समितीच्या अजिंठा चौफुलीवरील रास्ता रोको आंदोलनाच्यावेळी थेट अजिंठा चौफुली गाठून लेखी आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे ‘नही’चे अधिकारीही सोबत नेण्याची काळजी घेतली होती. त्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, हा भाग वेगळा. मात्र त्यावेळीही जिल्हाधिकाºयांच्या हजेरीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती या आनंदोत्सवाच्या निमित्ताने झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा आनंदोत्सव कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 6:35 PM